Weekly Horoscope 10 To 16 March 2025 : मार्च महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या नात्यात सामंजस्यपणा दिसून येईल. त्यामुळे आपापसांत वाद होणार नाहीत. तसेच, जोडीदाराला स्पेस देणं गरजेचं आहे. या तत्वाचं पालन केलं तर तुमचं नातं अधिक हेल्दी राहील. नात्यात संवाद साधणं देखील तितकंच गरजेचं आहे.
करिअर (Carrer) - तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये छोटे-मोठे वाद होऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. विविध मार्गातून पैशांचे स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. तसेच वेळोवेळी पैशांची गुंतवणूक करा. भविष्यासाठी उपयोगी पडतील.
आरोग्य (Health) - या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला पचनशक्तीच्या संदर्भात काही त्रास जाणवू शकतात. अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका.
कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या मनात जर एखाद्या व्यक्तीविषयी भावना असतील तर त्या वेळीच व्यक्त करा. जे वैवाहिक जीवन जगतायत त्यांचं नातं अधिक घट्ट होईल. सिंगल लोकांना लवकरच नवीन पार्टनर भेटेल.
करिअर (Career) - जे लोक क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी पुढचा आठवडा फार चांगला जाणार आहे. तुम्हाला नवीन गोष्टी अनुभवता येतील. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे.
स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. तुमच्या खर्चावर फक्त लक्ष द्या. तसेच, गुंतवणुकीच्या संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भविष्यात या गोष्टी फार उपयोगी येतील.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचा योग्य डाएट फॉलो करणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: