Paduka Darshan Sohala 2025 : भक्ती शक्ती व्यासपीठ आणि श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव समितीच्या वतीने वरळी येथे पादुकादर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पादुकादर्शन सोहळ्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते श्री संत गुळवणी महाराजापर्यंतची यादी दिली आहे. मात्र संतांच्या या यादीत डॉ. बालाजी तांबे (Dr Balaji Tambe) यांच्या पादुकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संत, महात्मांच्या यादीत डॉ. बालाजी तांबे यांचे नाव कसं? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. तर दुसरीकडे वारकरी संप्रदायातून देखील तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी संत ज्ञानेश्वर,संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव आल्याने नवा वाद देखील रंगण्याची चिन्ह आहे.
महाराष्ट्राची संतपरंपरा फार मोठी. राज्यासह देशाच्या जडणघडणीत संत, महात्मांनी महत्वाची भूमिका बाजावली आहे. तसेच वेळोवेळी लोकांना योग्य मार्ग देखील दाखवला आहे. अशातच या महान संतांच्या पादुकांचे दर्शन साऱ्यांना एकाच ठिकाणी व्हावं, या उदात्त हेतूनं वरळी येथे भक्ती शक्ती व्यासपीठ आणि श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव समितीच्या वतीने दोनदिवसीय संत आणि योगी पुरुषांच्या मूळ पादुका दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सोहळ्यातील संतांच्या यादीत डॉ. बालाजी तांबे यांचा समावेश करण्यात आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहे. परिणामी, संतांच्या यादीत तांबे यांचा समावेश कसा होऊ शकतो, असा प्रश्न वारकरी संप्रदायातून उपस्थित करण्यात येत आहे.
भक्ती शक्ती व्यासपीठाला आवश्यकता असेल ती मदत करू- देवेंद्र फडणवीस
भक्ती शक्तीच्या माध्यमातून समतायुक्त समाज तयार होईल, संकुचित विचार सोडून देशाच्या कल्याणच काम होईल. यासाठी हे माध्यम तयार झालंय. प्रभू श्री राम ज्या वेळी वनवासात गेले त्यावेळी भारत यांनी 14 वर्षे श्रीराम पादुका घेऊन राज्य केलं. सूक्ष्मरुपी गुरू असतात. अशा या पादुका असतात. त्याचं दर्शन घेतो तेव्हा गुरू माऊलींच दर्शन होते. 21 गुरुजनांचा पादुका आल्यात आल्या आहेत. समाजाला दिशा दाखवली त्यांच्या या पादुका आहेत. त्यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन जाऊ. मूल्याधिष्ठित जीवन कसे जगता येईल, लोक कल्याणकारी काम करता येईल. अशा प्रकाराचा प्रयत्न करूया. समाजातील विविध लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करूया. भक्ती शक्ती व्यासपीठाला जे आवश्यक आहे ते राज्यसरकारचे वतीने मदत करू, अस आश्वासन देतो. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या