Weekly Horoscope 09 To 15 December 2024 : आजपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. डिसेंबरचा दुसरा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठड्यात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा होणार आहे. एकूणच 2024 वर्षाच्या शेवटच्या महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी अनुभवायला मिळतील. मात्र, या काळात तुम्ही कोणताही नवीन निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला त्याचा पश्चात्ताप होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. पण, तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


डिसेंबरचा दुसरा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या काळात तुम्ही धैर्याने काम करणं गरजेचं आहे. तसेच, तुम्ही करिअरमध्ये टीमवर्कवर भर द्यावा. टीमच्या मदतीने तुमचं प्रोजेक्ट पूर्ण करा. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. तसेच, गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमची एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीशी भेट होऊ शकते. तसेच, तुमच्याकडे नेटवर्किंगचे बरेच साहित्य उपलब्ध असेल. 


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. या दरम्यान अनेक संकटं तुमच्यावर ओढावू शकतात. अशा वेळी मानसिक संतुलन न ढासळू देता येणाऱ्या परिस्थितीचा सामना करा. आर्थिक बाबतीत सामंजस्याने निर्णय घ्या.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर या आठवड्यात चांगला मुहूर्त आहे. 


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. या आठवड्यात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्या. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण असेल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्हाला काळजी वाटेल. 


तूळ रास (Libra Weekly Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांचं नवीन आठवड्यात ध्येय साध्य होईल. त्यासाठी तुम्ही आणखी मनापासून प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच, या काळात तुम्ही परदेशात जाण्याची देखील शक्यता आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासात व्यस्त असतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. 


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात वाईट विचारांपासून दूर राहा. तसेच, मित्रांची संगत चांगली जोडा. जे तुम्हाला चार गोष्टी चांगल्या शिकवतील अशा मित्रांचा शोध घ्या. तुमचं मनोबल वाढेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लकी ठरणार आहे. या काळात तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता भासणार नाही. तसेच, तुमचं मन विचलितही होणार नाही. तुम्ही तुमच्या धैर्याशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या नोकरीत परिवर्तनाचे योग जुळून आले आहेत. त्यामुळे तुमच्या दिनश्चर्येत बदल करा.


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांना आत्मपरिक्षणाची गरज आहे. अन्यथा अनेकजण तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही धार्मिक स्थळाला भेट द्या. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल.तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असेल. या आठवड्यात तुमचं मन अस्वस्थ असेल. या आठवड्यात तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसून येईल. तसेच, तुमच्यावर आई-वडिलांचा आशीर्वाद असेल. तसेच, खर्च वाढण्याची शक्यता आहे. 


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांमध्ये भरभरून आत्मविश्वास असणार आहे.या काळात तुम्हाला भरपूर संयम ठेवावा लागेल. तसेच, तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तुमचं मनोबल वाढेल. पण, अति आत्मविश्वास बाळगू नका. अन्यथा तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Gochar 2025 : शनी करतोय मीन राशीत प्रवेश; नवीन वर्षात 'या' 3 राशी जगतील राजासारखं आयुष्य; शनीची राहील कृपा