Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानतात. शनी (Lord Shani) प्रत्येक राशीला किंवा प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देत. त्यामुळे जेव्हाशी शनीचं राशी परिवर्तन होतं तेव्हा सर्व राशींसाठी हा काळ फार महत्त्वाचा असतो. नवीन वर्ष 2025 मध्ये शनी राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे हा काळ 3 राशींसाठी सुवर्णकाळ असणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 


ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षात अनेक ग्रह राशी परिवर्तन, संक्रमण करणार आहेत. त्यानुसार, नवीन वर्षाच्या मार्च महिन्यात कर्मफळदाता शनी देखील राशी परिवर्तन करणार आहे. शनी सध्या कुंभ राशीत आहे त्यानंतर तो मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. 


29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आह. या राशीत शनी अडीच वर्षांपर्यंत स्थित असणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


शनीचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही चांगलं यश मिळवाल. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


शनीच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. विद्यार्थ्यांना देखील परीक्षेत चांगले गुण मिळतील. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


शनीच्या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या लोकांना देखील चांगला लाभ होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. तसे, नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तुमची चांगली प्रगती होईल. तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. एकंदरीत वातावरण चांगलं आणि प्रसन्न पाहायला मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                            


Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार, पदरात पडेल पुण्य