Weekly Horoscope 09 To 15 December 2024 : डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. 2024 वर्षातील शेवटचा महिना असल्या कारणाने हा महिना फार खास असणार आहे. तसेच, या आठवड्यात मार्गशीर्ष महिना देखील सुरु होतोय. त्यामुळे एक प्रकारे धार्मिक महत्त्व आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबरचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा सकारात्मक असेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य दिसून येईल. आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन आठवड्यात तुमच्या अनेक लोकांशी गाठीभेटी होतील. या सगळ्यांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा नवीन संधी घेऊन येणारा असेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. अभ्यासात तुमचं मन चांगलं रमेल. तसेच, नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा नवीन संधी घेऊन येणारा असेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल. लोकांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. समाजात मान-सन्मान चांगला मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात जास्त व्यस्त व्हाल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आत्मपरिक्षणाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जुन्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. तसेच, नवीन प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. तसेच, नवीन आठवड्यात तुमचा प्रवासाला जाण्याचा देखील चांगला योग आहे. त्यामुळे धार्मिक कार्यात मग्न व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :