Weekly Horoscope 09 To 15 December 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. डिसेंबरचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होत आहे, त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी अनुभवायला मिळतील. मात्र, या काळात तुम्ही कोणताही नवीन निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला त्याचा पश्चात्ताप होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. पण, तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
डिसेंबरचा दुसरा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या काळात तुम्ही धैर्याने काम करणं गरजेचं आहे. तसेच, तुम्ही करिअरमध्ये टीमवर्कवर भर द्यावा. टीमच्या मदतीने तुमचं प्रोजेक्ट पूर्ण करा. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. तसेच, गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमची एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीशी भेट होऊ शकते. तसेच, तुमच्याकडे नेटवर्किंगचे बरेच साहित्य उपलब्ध असेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. या दरम्यान अनेक संकटं तुमच्यावर ओढावू शकतात. अशा वेळी मानसिक संतुलन न ढासळू देता येणाऱ्या परिस्थितीचा सामना करा. आर्थिक बाबतीत सामंजस्याने निर्णय घ्या.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर या आठवड्यात चांगला मुहूर्त आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असेल. त्यानंतर तुम्हाला सावध राहावं लागेल. कोणीही तुमच्या भावनांचा अनादर करु शकतं. तसेच, कोणाकडून अपेक्षा करु नका. सुखी राहाल. या आठवड्यात कोणतीही एक कला जोपासण्याचा प्रयत्न करा. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :