Virgo Weekly Horoscope 6 to 12 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला (May Month) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कन्या राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कन्या राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


कन्या राशीचे लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)


या आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये चांगले दिवस येतील. वातावरण आनंदी असेल. जोडीदाराबरोबर असलेलं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. जोडीदाराच्या भावनांप्रती तुम्ही संवेदनशील असाल. जे तरूण अविवाहित आहेत त्यांना लवकरच लग्नाची शुभवार्ता मिळेल. तसेच, विवाहितांच्या आयुष्यात लवकरच आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या व्यवसायात तुमच्या जोडीदाराचा सहभाग तुमच्यासाठी फार मोलाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. पदोपदी जोडीदाराची साथ तुम्हाला लाभणार आहे. 


कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)


तुमच्या करिअरच्या उद्दिष्टांबाबत तुमची महत्त्वकांक्षा दिसून येईल. व्यावसायिक जीवनात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. ऑफिसमध्ये नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तसेच, प्रत्येक कामासाठी मेहनत घेण्याची तुमची पूर्ण तयारी असेल. नवीन व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा आठवडा चांगला जाणार आहे. 


कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)


कन्या राशीसाठी नवीन आठवडा आर्थिक बाबतीत शुभवार्ता देणारा आहे. या आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीत तुम्हाला हिस्सा मिळेल. मात्र, पैशांशी संबंधित निर्णय घाईत घेऊ नका. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. तसेच, मित्रांच्या मदतीने पैसे कमावण्याच्या तुम्हाला संधी मिळतील. 


कन्या राशीचे आरोग्य (Virgo Health Horoscope)


या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा. ऑफिसचा ताण घरी आणू नका. तसेच, कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवा. निरोगी जीवनशैली जगा. दररोजच्या जीवनात योग आणि ध्यान करा. तसेच, आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Numerology 6 to 12 May 2024 : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा सुपर लकी; ठरवलेलं प्रत्येक काम होईल पूर्ण, आरोग्यही राहील उत्तम