Virat Kohli: विराट कोहली घालतो 18 नंबरचीच जर्सी; हिंदू धर्मात या अंकाचं काय महत्त्व? जाणून घ्या
Virat Kohli Jersey Number: विराट कोहलीचा 5 नोव्हेंबरला जन्मदिवस आणि याच दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं आहे. यादरम्यान काही रंजक तथ्य जाणून घेऊया.
Virat Kohli Birthday: विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावलं. विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 49 वं शतक आहे. या शतकासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 49 शतकं आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीसह सचिन तेंडुलकर संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. वाढदिवसाच्या दिवशीच विराट कोहलीने विक्रम रचला. आता या सगळ्यादरम्यान विराट कोहलीची जर्सी देखील त्याच्यासाठी लकी ठरत असल्यातं म्हटलं जात आहे.
वाढदिवसाच्या दिवशी रचला विक्रम
विराट कोहलीच्या जर्सी नंबरबद्दल जाणून घेण्याआधी स्पष्ट करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला होता. आज कोहली त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने भारतासाठी खूप धावा केल्या आणि अनेक विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यासारखे शतक कोणीही झळकावलेले नाही. त्यात आज बर्थडेला विराट कोहली सचिनच्या विक्रमाची बरोबरी करणार का? याचीच चर्चा रंगली होती. आज बर्थडे असल्याने विराटने हा भीम पराक्रम करावा, अशीच मनोकामना प्रत्येक भारतीयाची होती. किंग कोहलीनं आज संयमी खेळी करत हा पराक्रम गाठला देखील.
विराट का घालतो 18 नंबरची जर्सी?
सध्या विराट कोहलीबाबतच्या अनेक गोष्टी इंटरनेटवर सर्च केल्या जात आहेत. विराटचा स्कोअर, आयुष्य, लव्ह लाईफ, नेट वर्थ इत्यादींबद्दल महिती घेतली जात आहे. त्याच्या जर्सीबद्दल देखील लोकांना उत्सुकता आहे. विराट कोहली '18' क्रमांकाचीच जर्सी का घालतो? हे आज जाणून घेऊया.
सहसा, खेळाडूंच्या जर्सीवर एक नंबर लिहिलेला असतो, जो त्यांचा लकी नंबर तरी असतो किंवा जन्मतारीख असते. पण 18 हा कोहलीचा लकी नंबर नाही किंवा जन्मतारीख देखील नाही. कोहलीचा लकी नंबर 9 आहे आणि त्याची जन्मतारीख 5 आहे. यानंतरही तो 18 नंबरची जर्सी घालतो. याचं कारण जाणून घेतल्यावर तुम्ही भावूक व्हाल.
या कारणामुळे विराट घालतो 18 नंबरची जर्सी
कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक जिंकला तेव्हा त्याने 18 क्रमांकाची जर्सी घातली होती. 18 डिसेंबर 2006 रोजी कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाच्या दिवशी विराट रणजी सामना खेळत होता. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावं, असं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. म्हणून, जेव्हा विराटने 2008 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं तेव्हा तो नेहमी त्याच्या वडिलांच्या प्रेमामुळे आणि स्मरणार्थ या नंबरची जर्सी घालतो, जे त्याच्यासाठी लकी देखील आहे. कोहलीच्या मते, हा आकडा त्याला त्याच्या वडिलांच्या जवळचा वाटतो.
अंकशास्त्रात 18 हा अंक आहे विशेष
18 हा अंक विशेष आणि शुभ मानला जातो. अंकशास्त्रानुसार त्याची बेरीज 9 आहे, म्हणजे 1+8=9. अंकशास्त्रात 9 ही संख्या खूप शक्तिशाली मानली जाते. 9 क्रमांक मंगळ ग्रहाशी संबंधित आहे.
हिंदू धर्मात 18 क्रमांकाचं महत्त्व
- हिंदू धर्मात 18 क्रमांकाचं विशेष महत्त्व आहे. कारण धर्माशी संबंधित एकूण सिद्धींची संख्या (अनिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, महिमा, सिद्धी, इशित्व किंवा वशित्व, सर्वकामवास्यता, सर्वज्ञ, द्वार-श्रवण, सृष्टी, परकायप्रवेशण, वाकसिद्धी, कल्पवृक्षत्व, संहारकारनायत्व, संहारकत्व, संहारकत्व, सृष्टी, श्रवण) देखील 18 आहे.
- हिंदू धर्माच्या ज्ञानाचे देखील 18 प्रकार आहेत (छ वेदांग, चार वेद, पुराण, मीमांसा, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, धनुर्वेद आणि गंधर्ववेद).
- 18 प्रकारचे पीरियड्स देखील आहेत, ज्यात एक वर्ष, पाच ऋतू आणि 12 महिने समाविष्ट आहेत.
- श्रीकृष्णाच्या नात्यालाही 18 गुण आहेत, गीतेत 118 अध्याय आहेत आणि ज्ञानसागरातही 18 हजार श्लोक आहेत.
- माता भगवतीचीही 18 रूपं आणि 18 हात आहेत. माता भगवतीची 18 रूपं आहेत - काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, त्रिपुरभैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी, कुष्मांडा, कात्यायनी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, गायत्री, पार्वती, श्रीराधा, सिद्धिदात्री आणि भगवती.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Diwali 2023: दिवाळीत झाडू का खरेदी केला जातो? जाणून घ्या धनत्रयोदशीला झाडूच्या पूजेचं विशेष महत्त्व