Vinayak Chaturthi : 2025 वर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी; जाणून घ्या अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Vinayak Chaturthi 2025 : पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी उद्या म्हणजेच 3 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. यंदाच्या विनायक चतुर्थीला अधिक महत्त्व आहे.
Vinayak Chaturthi 2025 : हिंदू पंचांगानुसार, नवीन वर्षाची (New Year) सुरुवात जोरदार झाली आहे. त्यानुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आज म्हणजेच 3 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. यंदाच्या विनायक चतुर्थीला अधिक महत्त्व आहे. कारण या दिवशी गणपतीबरोबरच देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा असणार आहे.
त्यानुसार, विनायक चतुर्थीला गणपतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त नेमका कधी आणि कोणता आहे? तसेच, या दिवशी गणपतीची पूजा कशी करावी? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त (Vinayak Chaturthi 2025 Shubh Muhurta)
वैदिक पंचांगानुसार, विनायक चतुर्थी 3 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
पौष शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात - 3 जानेवारी रोजी रात्री 01 वाजून 08 मिनिटांनी सुरु होणार आहे.
चतुर्थी तिथीची समाप्ती - 03 जानेवारी रोजी रात्री 11 वाजून 39 मिनिटांनी होणार आहे.
विनायक चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त (Vinayak Chaturthi 2025 Puja Shubh Muhurta)
3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 23 मिनिटांपासून ते 01 वाजून 28 मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तात गणपतीची पूजा करावी.
विनायक चतुर्थीला पूजा कशी करावी?
धार्मिक मान्यतेनुसार, विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी सर्वात आधी स्नान करावे. तसेच, सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यानंतर घराची साफसफाई करुन भगवान गणेशाची विधीवत पूजा करावी. यामुळे आपल्याला विघ्नहर्त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: