Vinayak Chaturthi 2024 : हिंदू धर्मात गणपतीला (Lord Ganesha) प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे.


पंचांगानुसार, चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. एक शुक्ल पक्षात, तर दूसरी कृष्ण पक्षात. त्यानुसार, 05 नोव्हेंबर रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. त्यानुसार विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घेऊयात. 


विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त वेळ 


पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी 5 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानुसार, शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 4 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 6 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजून 16 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. उद्यतिथीनुसार, कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी  मंगळवार 05 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. तर, या दिवशी अभिजीत मुहूर्तावर गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाईल. 


विनायक चतुर्थी पूजा पद्धत


या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर चौरंगावर गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा, यानंतर शुभ मुहूर्तावर विधीनुसार गणेशाची पूजा करा. श्रीगणेशाची मूर्ती समोर ठेवून जलाभिषेक करावा. पूजेदरम्यान गणपतीला दुर्वा, फुलं, कुंकू अर्पण करा. देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावा. गणपतीला मोदक आणि दुर्वा गवत खूप आवडतात असं म्हणतात, त्यामुळे चतुर्थीला मोदक बनवणं शुभ मानलं जातं. गणपतीला मोदकांचा प्रसाद दाखवून शेवटी श्रीगणेशाची आरती करून घरातील सर्व सदस्यांना प्रसाद वाटप करा.


विनायक चतुर्थीला करा 'हे' उपाय



  • कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी उंदरावर बसलेल्या गणेशाची मूर्ती किंवा चित्राची पूजा करा, याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

  • गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करा. यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

  • गणपतीला मोदकाशिवाय दुर्वाही आवडतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी 'इदं दुर्वदलं ॐ गं गणपतये नमः' हा मंत्र म्हणत गणपतीला 5 किंवा 21 गाठी दुर्वा अर्पण करा.

  • विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी गणपतीला लाल सिंदूर तिलक लावा आणि स्वतःलाही तिलक लावा.

  • या दिवशी पूजा करताना श्रीगणेशाला शमीची पानं अर्पण करा, यामुळे श्रीगणेश प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:  


November Month Calendar 2024 : तुळशी विवाहापासून ते शिवरात्रीपर्यंत...नोव्हेंबर महिन्यातील प्रमुख उपवास आणि सणांची संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर...