November Month Calendar 2024 : हिंदू धर्मग्रंथात पूजा, तिथी आणि सणांना (Festivals) विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. वर्षाच्या 12 महिन्यांतील प्रत्येक महिन्यात काही उपवास, तिथी आणि सण साजरे केले जातात. हे सण-समारंभ वेगवेगळ्या देवी-देवतांना समर्पित आहे. ऑक्टोबर महिना संपून आता नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे.नोव्हेंबर   महिन्यात लक्ष्मीपूजन, तुलसी विवाह, बालदिन आणि संकष्ट चतुर्थी  असे मोठे सण साजरे केले जाणार आहेत.   


तर नोव्हेंबर महिन्यात कोणते प्रमुख सण साजरे केले जाणार आहेत ते जाणून घेऊयात. 


नोव्हेंबर महिना सणांची संपूर्ण यादी येथे पाहा 


1 नोव्हेंबर , शुक्रवार - लक्ष्मीपूजन , दर्श अमावस्या 


2 नोव्हेंबर, शनिवार - बालिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, कार्तिक मासारंभ


3 नोव्हेंबर, रविवार - चंद्रदर्शन 


5 नोव्हेंबर, मंगळवार - विनायक चतुर्थी (अंगारक योग) 


8 नोव्हेंबर, शुक्रवार - जलाराम जयंती


9 नोव्हेंबर, शनिवार - दुर्गाष्टमी 


10 नोव्हेंबर, रविवार - कुष्मांड नवमी


12 नोव्हेंबर, मंगळवार - प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा


13 नोव्हेंबर, बुधवार - तुलसी विवाहरंभ 


14  नोव्हेंबर, गुरुवार - बालदिन, पंडित नेहरु जयंती 


15 नोव्हेंबर, शुक्रवार - गुरुनानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, तुलसीविवाह सप्तमी


18 नोव्हेंबर, सोमवार - संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 08.16


21 नोव्हेंबर, गुरुवार - गुरुपुष्यामृतयोग 


23 नोव्हेंबर, शनिवार - कालाष्टमी 


26 नोव्हेंबर, मंगळवार - आळंदी यात्रा 


28 नोव्हेंबर, गुरुवार - प्रदोष, महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी 


29 नोव्हेंबर, शुक्रवार - शिवरात्री


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:      


Tulsi Vivah 2024 : 12 की 13 नोव्हेंबर तुळशी विवाह नेमका कधी? पाहा अचूक तारीख आणि शुभ मुहूर्ताची वेळ