Vidur Niti : महात्मा विदुर (Mahartma Vidur) हे दासी पुत्र होते. ते महाराज धृतराष्ट्राचे बंधू व सरदार होते. महाभारत काळात त्यांनी महाराज धृतराष्ट्रांना प्रत्येक मानवी जीवनाच्या तसेच स्वतःच्या जीवनाच्या कल्याणाविषयी सांगितले होते, जे आजही प्रत्येक मानवाच्या प्रगती आणि कल्याणासाठी फायदेशीर आहे. माणसाच्या या वाईट सवयी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. त्यांना अधोगतीकडे नेतात. त्यामुळे या सवयी ताबडतोब स्वतःपासून दूर कराव्यात.
माणसाच्या या सवयी वाईट असतात
लोभ आणि स्वार्थ
लोभ फार वाईट आहे, असे अनेकदा लोकांकडून ऐकायला मिळते. लोभाने मनुष्य स्वतःचेच नुकसान करतो. विदुर नीतीनुसार लोभ हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. लोभी माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. जो व्यक्ती लोभ करतो. त्याचे जीवन फार लवकर नष्ट होते आणि तो कधीही आनंदी नसतो.
राग
क्रोध हे विनाशाचे मूळ कारण आहे असे म्हणतात. यासाठी कधीही रागावू नये. विदुर नीतीनुसार, रागाच्या भरात व्यक्ती योग्य-अयोग्य ठरवण्याची शक्ती गमावून बसते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती काहीतरी चूक करून स्वतःचे नुकसान करून घेत असते.
इतरांवर हसू नका
महात्मा विदुर म्हणतात, कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीवर हसू नये, तसेच त्याची थट्टा करू नये, कारण जी व्यक्ती इतरांना हसते. त्याच्यावरच वाईट वेळ येते. तसेच अशा लोकांना समाजात मान मिळत नाही. माणसाची ही सवय त्याला त्याच्या प्रगतीपासून रोखते आणि अधोगतीकडे घेऊन जाते.
त्याग भावनेचा अभाव
त्यागाची भावना हा माणसाचा एक अद्वितीय गुण आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख-शांती कायम राहते. विदुर नीतिनुसार ज्या व्यक्तीमध्ये त्यागाची भावना नसते. तो खूप स्वार्थी माणूस आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या आनंदाशिवाय काहीही दिसत नाही. अशा माणसाला दु:खाच्या वेळी आधार मिळत नाही. विदुरच्या मते ज्या लोकांमध्ये त्यागाचा गुण नसतो. त्यांचे आयुष्य कमी मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय