Todays Headline 20th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


शिवाजी पार्क कोणाचं?  उच्च न्यायालयात सुनावणी


शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे.    रितसर पूर्वपरवानगी मागूनही मुंबई महापालिकेडून उत्तर नाही. पालिका प्रशासनावर राज्य सरकराचा दबाव असल्याचा याचिकेत आरोप आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.   1966 पासून शिवसेना पक्ष म्हणून शिवाजी पार्कावर दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची परंपरा आहे.  त्यामुळे यादिवशी देशभरातील कार्यकर्ते कोणत्याही निमंत्रणाविना शिवाजी पार्कवर दाखल होतात, त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी, शिवसेनेने याचिकेत केला आहे. 


 मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर 


 मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीतील अंबादेवी मंदिरात सुद्धा राज ठाकरे जाऊन दर्शन घेण्याची शक्यता आहे.  तसेच राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत


 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर  आहेत. विचारपरिवार समन्वय बैठक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर आहेत. सकाळी 7.55 वाजता रेल्वेने निघणार आहेत. दापोली पोलिस स्टेशन, प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.


राजू श्रीवास्तव यांच्यावर  अंत्यसंस्कार


 राजू श्रीवास्तव यांच्यावर आज सकाळी 10 वाजता निगम बोध येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 8 वाजता दिल्लीच्या दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघणार आहे.


केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर हिंगोली  दौऱ्यावर


केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे


केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी चंद्रपूर  दौऱ्यावर 


भाजपतर्फे चंद्रपूर लोकसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी चंद्रपूर शहरात येणार आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.