Vat Savitri Vrat 2022 : आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विवाहित स्त्रिया वट सावित्री व्रताची पूजा करतात. ज्या महिला प्रथमच वट सावित्री व्रत करणार आहेत, त्यांना पूजा मुहूर्त, पूजा पद्धती याविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वट सावित्री व्रत हे पतीचे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी केले जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळले जाते. यंदाची वटपौर्णिमा (Vat Purnima) 14 जून 2022 रोजी आहे


वट पौर्णिमा व्रत 2022 मुहूर्त
ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेची सुरुवात: 13 जून, सोमवार, उत्तर रात्री 09.02 वा
ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथी: 14 जून, मंगळवार, संध्याकाळी 05.21 वा.
वट पौर्णिमा व्रत 2022: 14 जून, मंगळवारी साजरी केली जाईल
साध्‍य योग : सकाळपासून 09:40 वाजेपर्यंत हा शुभ योग आहे
वट पौर्णिमा व्रताचा मुहूर्त : भल्या पहाटेपासूनच प्राप्य व शुभ योग मागणीच्या कामांसाठी चांगले आहेत.


वट सावित्री व्रत 2022 पूजन : पूजा साहित्य


व्रत पाळणाऱ्या महिलांनी या वस्तू दोन टोपल्यांमध्ये ठेवाव्यात. यामध्ये सावित्री व सत्यवान यांची मूर्ती, कच्चे सुत, लाल रंगाचा कपडा, वडाचे झाड, उदबत्ती, मातीचा दिवा, फळ, फूल, बताशा, अगरबत्ती, सुपारी, नारळ, अक्षता, पाण्याने भरलेला कलश, तांब्या, पाणी, 2 विड्याची पाने, हळदी कुंकू, साखर, सौभाग्याचं लेणं आदी..


ओटी घालण्यासाठी लागणारे साहित्य 
-गहू
-पाच प्रकारची फळ 
-दूध आणि पाणी
-सौभाग्याचं लेणं
-विड्याची पान
-खारीक,खोबर, हळकुंड, सुपारी, बदाम
- सूतगुंडी - ७ फेरे घेण्यासाठी


वटपौर्णिमा पूजाविधी 
- प्रथम वडाच्या झाडाला पाणी घालून घायचे.
-नंतर विड्याचे पान व सुपारी, पैसे घेऊन पूजा करायची आहे.
-नंतर वडा च्या झाडाला कच्या धाग्याने 5 किंवा 7 फेरे मारावे.
-कापसाचं वस्त्र झाडाला बांधावे व आरती करावी.
-मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावावे.  


वट सावित्री व्रत, पूजेचे महत्त्व 
वट सावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांना सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते. पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केले जाणारे हे व्रत त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी घेऊन येते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :