एक्स्प्लोर

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला वटवृक्षाभोवती सूत का गुंडाळतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला वटसावित्री असं देखील म्हणतात. आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं, त्याला उदंड आयुष्य लाभावं यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतता. 

Vat Purnima 2024 : हिंदू धर्मग्रथांनुसार, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. वटपौर्णिमेला (Vat Purnima) वटसावित्री असं देखील म्हणतात. आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं, त्याला उदंड आयुष्य लाभावं यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतता. 

खरंतर, वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक गोष्टींची तयारी केली जाते. जसे की, वडाच्या झाडाला फेऱ्या घालणे, पूजेचं साहित्य तयार करणे, वडाच्या झाडाला धागा गुंडाळणे. यांसारख्या अनेक रूढी-परंपरांचा समावेश असतो. 

वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त (Vat Purnima 2024 Shubh Muhurta)

वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे.

वटपौर्णिमेसाठी लागणारे पूजा साहित्य 

दोन हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पान, सुपारी, पैसे, गूळ -खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, देवीचा फोटो किंवा सुपारी इ. 

वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेची पद्धत 

ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ज्या महिलांनी उपवास ठेवला आहे त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतरच व्रताची सुरुवात करावी. तसेच, या दिवशी श्रृंगार करावा. पूजेचं साहित्य तयार करावं. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाला, फुले, वाण, पाणी देऊन त्याभोवती फेरे घालावे. आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. 

वडाच्या झाडाला सूत का गुंडाळतात? 

धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात असलेल्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. वट पौर्णिमेच्या पूजे दरम्यान, जेव्हा महिला वटवृक्षाच्या खोडाला सूत गंडाळतात त्यावेळी जिवाभावाने खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी आणि आग या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. अशी मान्यता आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे. 

वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व 

धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला 'अक्षयवत' असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Vat Purnima 2024 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात वटसावित्रीची पूजा; जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Horoscope Today 10 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 10 October 2026: आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले
घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Embed widget