Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेच्या दिवशी जुळून आला महासंयोग; 'या' सोप्या उपायांनी देवी लक्ष्मीला करा प्रसन्न, मनातील इच्छा होतील पूर्ण
Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेच्या शुभ दिनी पूजा आणि व्रत केल्याने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात, तसेच आयुष्यात सुख-समृद्धी, शांती नांदते असं म्हणतात.
Vat Purnima 2024 : वैदिक पंचांगानुसार, आज सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातोय. हिंदू धर्म मान्यतेनुसार, वटपौर्णिमेच्या (Vat Purnima) सणाला फार महत्त्व आहे. पतीच्या सौभाग्यासाठी, दिर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी सुवासिनी महिला या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास करतात.
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी स्नान-दान केल्याने सर्व कष्टांपासून सुटका मिळते. या शुभ दिनी पूजा आणि व्रत केल्याने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात, तसेच आयुष्यात सुख-समृद्धी, शांती नांदते असं म्हणतात.
आर्थिक चणचण होईल दूर
तुम्हाला जर अनेक दिवसांपासून पैशांची कमतरता जाणवत असेल तर आजच्या दिवशी तुम्ही यापासून सुटका मिळविण्यासाठी देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करा. 11 पिवळी पानं अर्पण करा. पूजा केल्यानंतर या पानांना लाल कपड्यात बांधून देव्हाऱ्या शेजारी ठेवा. असं म्हणतात की, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच, घरात सुख-शांती आणि उत्तम आरोग्य राहते. तसेच, पैशांचीही भरभराट होते.
सुखी वैवाहिक जीवनासाठी
वैवाहिक जीवनात सुरु असलेल्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी वटसावित्रीच्या दिवशी 21 वेळा वडाच्या झाडाभोवती परिक्रमण करा. तसेच, वडाच्या झाडाखाली दिव्यात तूप घालून दिवा तेवीत ठेवा आणि पूजा करा. असं म्हणतात, की असं केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.
ग्रह-दोषांपासून मुक्ती मिळविण्यासाठी...
जर तुमच्या कुंडलीत ग्रह-दोष असतील आणि त्यापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती 11 वेळा परिक्रमा करा. तसेच, वडाच्या झाडाची पूजा करा. वडाला कच्चं दूध अर्पण करा. मान्यतेनुसार, असं केल्याने कुंडलीतील ग्रह-दोषांपासून सुटका मिळते.
वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका
- वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये, त्याची फांदी तोडू नये. जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा.
- वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. कारण, या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानले जाते. तसेच, विवाहीत महिला या दिवशी लाल, हिरवा, पिवळा अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतात.
- वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नका. या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका.
- गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: