Vastu Shashtra: सकाळी उठल्याबरोबर 'या' गोष्टी बघाल तर पडेल महागात! पैशांचा ओघ थांबेल, सर्व काम बिघडेल, वास्तुशास्त्रात म्हटलंय..
Vastu Shashtra: वास्तुशास्त्रानुसार, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्याबरोबर पाहू नयेत. असे केल्याने तुमचे दिवसभराचे सर्व काम बिघडू शकते आणि पैशाचा ओघही थांबू शकतो.

Vastu Shashtra: आपल्या दिवसाची सुरूवात चांगली तसेच शुभ व्हावी, असे प्रत्येकालाच वाटत असते, त्यासाठी तो व्यक्ती अनेक प्रयत्नही करतो. मात्र अशा काही गोष्टी असतात, ज्याच्याकडे नकळत का होईना आपण पाहतो, आणि मग त्याच गोष्टी आपल्या यशाच्या मार्गात अडचण ठरतात. वास्तुशास्त्रानुसार, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्याबरोबर पाहू नयेत. असे केल्याने तुमचे दिवसभराचे सर्व काम बिघडू शकते आणि पैशाचा ओघही थांबू शकतो. सकाळची सुरुवात करताना वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींकडे पाहू नयेत? जाणून घेऊया.
सकाळी उठल्याबरोबर केलेल्या काही साध्या चुका नशीब खराब करू शकतात..
प्रत्येकाला आपला दिवस शुभ आणि यशस्वी हवा असतो पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने होते. असे म्हणतात की जर सकाळ चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. पूर्वीच्या काळात, वडीलधारी लोक नेहमी म्हणायचे की सकाळी उठल्यानंतर काही गोष्टींकडे पाहू नयेत पण आजही बरेच लोक याकडे लक्ष देत नाहीत. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत जे तुमचे नशीब सुधारू शकतात परंतु जर दुर्लक्ष केले तर हे उपाय तुमचे मोठे नुकसान देखील करू शकतात. सकाळी उठल्याबरोबर केलेल्या काही साध्या चुका तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम करू शकतात आणि तुमच्या आर्थिक आणि मानसिक समस्या देखील निर्माण करू शकतात.
सावली पाहू नये..
वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठताच स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नये. असे केल्याने मनात भीती निर्माण होते आणि निर्णय घेण्यास अडचणी येऊ शकतात.
आरशात पाहू नका..
वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहण्याची सवय अनेकांना असते, परंतु वास्तुनुसार असे करणे अशुभ मानले जाते. सकाळी लवकर आरशाकडे पाहिल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो जो दुर्दैव आणि गरिबीला आमंत्रण देऊ शकतो.
खरकट्या भांड्यांकडे पाहू नका.
वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठताच खरकटी भांडी दिसणे हा मोठा दोष मानला जातो. यामुळे तुमचा दिवसच खराब होत नाही, तर तुमच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून, रात्री झोपण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ करावीत.
बंद घड्याळाकडे पाहू नका.
वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठताच बंद घड्याळ दिसणे देखील अशुभ मानले जाते. थांबलेले घड्याळ म्हणजे वेळेत ब्रेक असणे आणि यामुळे तुमच्या दिवसात अडथळे आणि अडचणी येऊ शकतात. म्हणून बंद पडलेली घड्याळे दुरुस्त करा किंवा काढून टाका.
हेही वाचा..
Weekly Lucky Zodiac Sign: आजपासून सुरू होणारा नवा आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर! शुभ योगांनी नशीब चमकणार, साप्ताहिक भाग्यवान राशी जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.




















