(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : 'या' समस्या घरात वास्तु दोष असण्याचा देतात संकेत; चुकूनही दुर्लक्ष करु नका
Vastu Tips : घरात जर वास्तूच्या नियमांचं पालन नाही केलं तर वास्तू दोष लागण्याची शक्यता आहे. आयुष्यात येणारी संकटं तुम्हाला वास्तू दोषाचे संकेत देतात.
Vastu Tips : वास्तु शास्त्रानुसार, वास्तु शास्त्र (Vastu Tips) हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन्ही गोष्टींवर आधारित आहे. सकारात्मक गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. तर, नकारात्मक गोष्टींमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
घरात जर वास्तूच्या नियमांचं पालन नाही केलं तर वास्तू दोष लागण्याची शक्यता आहे. आयुष्यात येणारी संकटं तुम्हाला वास्तू दोषाचे संकेत देतात. त्यानुसार, तुमच्या घरात वास्तु दोष आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर त्याची काही लक्षणं आहे ती जाणून घेऊयात.
जेव्हा आर्थिक समस्या जाणवते
जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा खूप मेहनत करुनही तुम्हाला नेहमी आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या घरात वास्तु दोष असण्याची शक्यता आहे. जर अनेक प्रयत्न करुनही तुम्ही पैशांची बचत करु शकत नसाल तर घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला वास्तु दोष असण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्हाला घराच्या मुख्य द्वारापाशी खिडकी किंवा दिशा बदलण्याची गरज आहे.
जेव्हा कोणतीही गोष्ट सुरळीत होत नसेल तर...
जर तुमची ठरवलेली कामं अचानक बिघडत असतील किंवा त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या घराच्या मध्यभागी वास्तु दोष असण्याची शक्यता आहे. घराचा मध्य भाग हे ब्रह्म स्थान असतं. त्यामुळेच घराच्या मध्यभागी कोणत्याही प्रकारची जड वस्तू ठेवू नका. तसेच, घरातील या स्थानी चुकूनही शौचालय बांधू नका. कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते. यामुळे वास्तु दोष लागतो.
आरोग्याची समस्या
जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर तुमच्या घरात वास्तु दोष असण्याची शक्यता आहे. घराच्या दक्षिण पूर्व दिशेला ठेवलेल्या चुकीच्या वस्तू घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे घरातील ही दिशा रिकामी ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: