Vastu Tips For Main Entrance: वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेवर आधारित आहे. असे म्हटले जाते की, वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घर बांधल्यास घर कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप प्रभावी मानले जातात. सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते. अनेक वेळा सर्व काही योग्य पद्धतीने करूनही माणसाला पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागते. वास्तूशास्त्रानुसार, व्यक्तीच्या काही सवयी त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात, ज्यामुळे घरात आर्थिक संकट येते.आज आम्ही तुम्हाला दारात कोणत्या गोष्टी ठेवू नये या विषयी सांगणार आहेत.
दारात खालील गोष्टी चुकूनही ठेवू नका
दारात झाडू ठेवू नका
हिंदू धर्मात झाडूला केवळ स्वच्छतेसाठी नाही तर लक्ष्मी देवीशी निगडीत असते. झाडू संबंधीचे अनेक महत्त्वाचे नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की झाडू अशा ठिकाणी ठेवू नये की दरवाजा उघडताच समोर दिसतो. झाडू लपवून ठेवणे चांगले मानले जाते.
घरात निर्माण होईल वास्तूदोष
वास्तूशास्त्रानुसार गॅस सिलेंडर कधीही दरवाजा उघडताच कधीही समोर दिसेल असा ठेवू नये. अन्यथा वास्तू दोष निर्माण होईल.
कधीही ठेवू नका या गोष्टी
अनेकजण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पलचे स्टँड ठेवतात. पण वास्तूशास्त्रानुसार असे करणे योग्य नाही. दरवाजात चप्पलचे स्टँड ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. यासोबतच मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुटलेल्या खुर्च्या, डस्टबिन किंवा स्टूल इत्यादी ठेवणे टाळावे.
या गोष्टी ठेवा दारात
घरामध्ये सकारात्मकता टिकवून राहण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर ठेवता येते. यासोबतच मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप ठेवणे देखील शुभ मानले जाते. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावरील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
जर तुमच्यासोबतही असे घडले की, कमाई करूनही पैसे उरले नाहीत किंवा खर्च जास्त झाला तर त्याचे एक कारण वास्तुदोष असू शकते. त्यामुळे या चुकांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :