एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips For Home : घरात सुख-समृद्धीसाठी वास्तूच्या 'या' टिप्स खूप फायदेशीर; सकारात्मक ऊर्जेसाठी नक्की फॉलो करा
Vastu Tips For Home : वास्तूशी संबंधित दोष असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागते.
Vastu Tips For Home : वास्तूशास्त्रात (Vastu Shastra) ऊर्जा आणि दिशांना विशेष महत्त्व आहे. वास्तुमध्ये प्रत्येक कामासाठी शुभ दिशा सांगितल्या आहेत. वास्तूनुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या सदस्यांवर पडतो. घरामध्ये वास्तूदोष असेल तर व्यक्ती मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहतो. काही वास्तु उपायांचे पालन केल्यास समस्यांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येते. या वास्तूच्या सोप्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
वास्तूच्या सोप्या टिप्स
- वास्तूशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावी. स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेले स्वच्छ भांडे ठेवावे. असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या घरात धनाचा प्रवाह कायम राहतो. हा उपाय केल्याने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यताही वाढते.
- ज्या घरामध्ये कमलासनावर बसून सोन्याची नाणी टाकत आहेत, त्या घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचे असे चित्र लावावे. वास्तूनुसार देवी लक्ष्मीचे असे चित्र घरात लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.
- घराच्या उत्तर दिशेला पोपटाचे चित्र लावणे शुभ असते. त्यामुळे मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. पाण्याची टाकी घराच्या छतावर पश्चिम दिशेला ठेवावी. वास्तूच्या नियमानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही.
- वास्तूनुसार घराच्या प्रमुखाने दररोज भगवान शिव आणि चंद्र देवाच्या मंत्रांचा जप करावा. यामुळे घरात सुख-शांती नांदते. भगवान शिवाच्या मंत्रांचा नियमित जप केल्याने घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात.
- वास्तुशास्त्रानुसार घराचा नैऋत्य भाग उंच असेल तर ते खूप शुभ मानले जाते. अशा घरात सदैव समृद्धी असते आणि घरातील सदस्यांची खूप प्रगती होते. घराच्या नैऋत्य भागात दगड असेल तर ते देखील खूप फायदेशीर आहे.
- घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्राची स्थापना करा. पूर्वाभिमुख घरामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर सूर्याचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope 15 to 21 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement