Vastu Tips : पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
Vastu Tips For Wallet : पाकिटात आपण पैसे सोडल्यास इतर अनेक गोष्टीदेखील ठेवतो पण तुम्हाला माहीत आहे का की अशा चार गोष्टी आहेत ज्या चुकूनही पाकिटात ठेवणं चुकीचं आहे.

Vastu Tips For Wallet : खरंतर, आपल्या आयुष्यात कधी काय चांगलं होईल हे कोणालाच सांगता येत नाही. पण, असं म्हणतात की, वास्तू शास्त्रानुसार (Vastu Shastra), काही उपाय केल्याने अनेक गोष्टी तुम्ही सहज साध्य करु शकता. यामध्येच पाकिटाशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत.
पाकिटात आपण पैसे सोडल्यास इतर अनेक गोष्टीदेखील ठेवतो पण तुम्हाला माहीत आहे का की अशा चार गोष्टी आहेत ज्या चुकूनही पाकिटात ठेवणं चुकीचं आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. तसेच, आर्थिक तंगी सुरु होऊ शकते. या 4 गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
पूर्वजांचा फोटो ठेवू नये
वास्तू शास्त्रानुसार, चुकूनही पाकिटात पूर्वजांचा फोटो ठेवू नका. तसेच, देवी-दैवतांचा फोटोदेखील खिशात ठेवणं फार अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की, असे केल्याने वास्तूदोष लागतो. त्याचबरोबर देवी लक्ष्मीसुद्धा नाराज होते. यामुळे तुमच्या घरात पैशांची आवक कमी होऊ लागते. आणि कुटुंबावर संकट ओढावण्याची शक्यता असते.
पर्समध्ये नोटा दुमडून ठेवू नका
अनेकदा आपल्याला सवय असते की पैसे खर्च केल्यानंतर उरलेले पैसे दुमडून आपण तसेच पाकिटात ठेवतो. खरंतर, नोटांना आणि नाण्यांना देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. अशातच जर नोटांना जर तुम्ही वाईट अवस्थेत पर्समध्ये ठेवत असाल तर तो एक प्रकारे पैशांचा अपमानच आहे. या सवयीमुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
खोट्या वस्तू ठेवू नका
पाकिटात चुकूनही नेल कटर, चावी, चाकू, पिन किंवा अन्य कोणत्याही वस्तू ठेवू नका. असं केल्याने घरात वास्तू दोष होऊ शकतो. यामुळे तुमच्या होणाऱ्या कामातही अडथळे येऊ शकतात. तसेच, कुटुंबातील लोकांना साथीचे रोग होण्याची शक्यता असते. यामुळे तुमचा बराचसा पैसा वाया जाण्याची शक्यता असते.
पर्स कधीच रिकामी ठेवू नका
वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या पाकिटाला कोणत्याही परिस्थितीत रिकामी ठेवू नका, वास्तू शास्त्रानुसार, असं केल्याने फार अशुभ परिणाम मिळतात. यासाठीच पाकिटात थोडेसे का असेना पण पैसे ठेवणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा



















