एक्स्प्लोर

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराचं रुपडं पालटणार; भव्य महाद्वार उभारणार, बांधकामाआधी स्ट्रक्चरल ऑडिट सुरू

Dharashiv : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी तिर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट होणार आहे, यादरम्यान नवीन महाद्वाराची देखील उभारणी करण्यात येईल.

Tuljabhavani Temple : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी तिर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी 58 कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. मंदिर समितीच्या स्वनिधीतून 58 कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात आली आहेत. यात तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजे शहाजी महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून बांधकाम किती दिवस टिकू शकतं याचा अहवाल आल्यानंतर नवीन महाद्वाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार

तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला तर दोन्ही महाद्वार पाडून 108 फुटी नवं महाद्वार बांधलं जाणार आहे. तर ऑडिट रिपोर्ट सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वारांच्या मध्ये नवीन महाद्वार तयार बांधलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.

एकूण 58 कोटी 12 लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता

श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरातील नुतनीकरणाच्या विविध विकासात्मक कामास मंदिर संस्थानकडून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुरुवात करण्यात आली आहे. एकूण 58 कोटी 12 लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीन टप्प्यांमध्ये  हे काम होणार असून मंदिर परिसरातील काही वास्तू यादरम्यान हटवल्या जाणार आहेत.

सभामंडपचा काही भाग पूर्ण पाडणार

भाविकांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून कामाची वर्गवारी करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. कामाबाबत स्थानिक नागरिक, पुजारी, व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या. पुरातत्व खात्याच्या निगराणीाखाली कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या सभामंडपचा काही भाग पूर्ण पाडून पुन्हा नव्याने मजबूत केला जाणार आहे. मंदिरासह आसपासचा भागही मोकळा करून घेतला जाणार आहे. 

वर्षभरात काम पार पाडणार

पुढील वर्षभरात मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. दरम्यान भाविक, पुजारी बांधव आणि व्यापारी वर्गाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये यामुळे मोठी वाढ होणार आहे.

पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्प उभारणार

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्थाही केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर प्रत्येक भक्त हा अत्यंत उत्साहात आणि समाधानाने आपल्या घरी जावा, असंही नियोजन करण्यात येत आहे. देशभरातून येणार्‍या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा:

Astrology : वर्ष 2025 'या' 3 राशींसाठी ठरणार खास; 29 मार्चपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
Lord Shiv: सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 
सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget