Tuesday Upay: आजचा मंगळवार इच्छापूर्ती करणारा, रात्री घरी करा 'हे' लवंगांचे उपाय, पैशाची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही...
Tuesday Upay: धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित दिवस आहे. तसेच, मंगळवारी केलेले काही उपाय धनलाभासाठी अत्यंत प्रभावी आहेत.

Tuesday Upay: पत्रिकेत मंगळ असल्याचे समजल्यास अनेकांना धडकी भरते, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार पाहिल्यास, तुमच्या पत्रिकेत जर मंगळ शुभ असेल तर व्यक्ती भरपूर संपत्तीचा मालक बनतो. तसेच, त्याला वैवाहिक सुख मिळते. तो निर्भय, धाडसी आणि उत्साही असतो. परंतु काही वेळेस, एखादी व्यक्ती मेहनती असूनही पुरेसे पैसे कमवू शकत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, जर मंगळवारी काही उपाय केले तर व्यक्तीला संपत्ती, समृद्धी आणि आनंदी जीवन मिळते. कारण धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवार हा भगवान हनुमानाचा आशीर्वाद मिळविण्याचा दिवस आहे. आणि मंगळवारी केलेले काही उपाय धनलाभासाठी अत्यंत प्रभावी आहेत. तसेच, ते अनेक मोठ्या समस्यांपासून मुक्तता देतात.
कामात यश मिळविण्यासाठी उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळवायचे असेल तर मंगळवारी हनुमान मंदिरात जा. नंतर मंदिरातच एका लिंबावर 4 लवंगा ठेवा. यानंतर, ते हनुमानजीसमोर ठेवा आणि त्यांच्यासमोर बसून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करा. नंतर पिंपळाच्या झाडाखाली लवंगासह तो लिंबू ठेवा. यामुळे कामात यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील.
पैसे मिळविण्यासाठी उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार, जर सतत पैशाची कमतरता असेल. उत्पन्न वाढत नसेल किंवा घरात पैसा राहत नसेल. तर मंगळवारी उपवास करा. तसेच हनुमानजींची पूजा करा. रात्री एक लिंबू घ्या आणि तो तुमच्या डोक्यावरून फिरवून त्याचे 2 भाग करा. नंतर चौकात जाऊन त्यातील एक तुकडा पुढे आणि एक मागे फेकून द्या.. यानंतर, घरी जा. पैसे मिळविण्यातील अडथळे दूर होतील. उत्पन्न वाढेल.
रोजगार मिळविण्यासाठी उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा इच्छित नोकरी मिळत नसेल तर मंगळवारी उपवास करा. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. हनुमानजींना तुमची समस्या सांगा आणि ती सोडवण्यासाठी प्रार्थना करा. तसेच, मंगळवारी रात्री, डाग नसलेला लिंबू घ्या, त्याचे 4 भाग करा आणि चारही दिशांना फेकून द्या. लवकरच अडथळे दूर होतील आणि तुम्हाला शुभवार्ता मिळेल.
हेही वाचा :
Pithori Amavasya 2025: यंदाची पिठोरी अमावस्या 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन येतेय! तिथी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व, A टू Z माहिती वाचा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















