एक्स्प्लोर

Trigrahi Yog 2024 : 19 मे पासून 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; अनेक वर्षांनंतर वृषभ राशीत जुळून येतोय वृषभ राशीत 'त्रिग्रही योग'

Trigrahi Yog 2024 : वृषभ राशीमध्ये सूर्य, गुरु आणि शुक्र या तीन ग्रहांच्या एकत्रीकरणामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. असा त्रिग्रही योग अनेक वर्षांनी वृषभ राशीत तयार होत आहे.

Trigrahi Yog 2024 : वैदिक ज्योतिषानुसार, मे महिन्यात त्रिग्रही योग जुळून येणार आहेत. सर्वात आधी, 1 मे रोजी गुरूचे वृषभ राशीत संक्रमण झालं. यानंतर, 14 मे रोजी, सूर्याने (Sun) वृषभ राशीत (Taurus Horoscope) प्रवेश केला. आता 19 मे रोजी शुक्र स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करत आहे. यामुळे वृषभ राशीमध्ये सूर्य, गुरु आणि शुक्र या तीन ग्रहांच्या एकत्रीकरणामुळे त्रिग्रही योग (Trigrahi Yog) तयार होत आहे. असा त्रिग्रही योग अनेक वर्षांनी वृषभ राशीत तयार होत आहे. सर्व राशींवर याचा मोठा प्रभाव पडणार आहे. हा योग 4 राशींच्या लोकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि भरपूर पैसेही मिळू शकतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना त्रिग्रही योगाचा फायदा होणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दिसून येईल. तुम्हाला एकाच वेळी अनेक नवीन प्रकल्प मिळू शकतात. अनेक नवीन गोष्टी शिकण्याची तुमची उत्सुकता वाढेल. करिअरला गती मिळेल. व्यावसायिकांना नवीन ऑफर्स मिळतील. तुमचं वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफ चांगले राहील. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगही खूप चांगले परिणाम देणारा ठरणार आहे. तुमची प्रगती होईल. आतापर्यंत प्रलंबित असलेली तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्हाला इच्छित पद आणि पैसा मिळेल. आर्थिक लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणूक करण्यचाी तुमची इच्छा असल्यास करू शकता.  

कर्क रास (Cancer Horoscope)

हा त्रिग्रही योग तुम्हाला धन मिळवून देईल आणि कर्क राशीच्या लोकांना प्रगती आणि सन्मान देईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या योगामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला नवीन स्त्रोतांकडून पैसे देखील मिळू शकतात. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबियांबरोबर एखाद्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्राच्या संक्रमणामुळे तयार झालेला हा त्रिग्रही योग या राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. या लोकांचे करिअर वेगाने प्रगती करेल. व्यवसायाचा विस्तार होईल. उत्पन्नात वाढ होईल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. लव्ह लाईफ चांगली राहील. अविवाहितांना जोडीदार मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Shani Dev : ना साडेसाती, ना ढैया, ना वक्री चाल 2024 अखेरपर्यंत 'या' 4 राशींवर असणार शनीची कृपा; चौफर मिळेल आनंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 07 March 2025Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगीAmbadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
Embed widget