(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : ना साडेसाती, ना ढैया, ना वक्री चाल 2024 अखेरपर्यंत 'या' 4 राशींवर असणार शनीची कृपा; चौफर मिळेल आनंद
Shani Dev : शनीने नुकतंच पूर्वा भाद्रपदमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना शनीचं हे परिवर्तन भाग्याचं ठरलं आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रात, शनीचं (Shani Dev) स्थान फार महत्त्वाचं आहे. शनीला पापी ग्रह देखील म्हटलं गेलं आहे. शनीच्या (Lord Shani) अशुभ प्रभावाने सर्वांनाच भीती वाटते. जेव्हा शनी अशुभ असतो तेव्हा व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. तर, शनी शुभ असेल तर जीवन आनंदी होते. शनीने नुकतंच पूर्वा भाद्रपदमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना शनीचं हे परिवर्तन भाग्याचं ठरलं आहे. या राशीच्या लोकांना 2024 च्या अखेरपर्यंत शुभ परिणाम मिळतील. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या राशी परिवर्तनाने मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. तसेच, या दरम्यान तुमची आर्थिक बाजू चांगली असेल. तुम्ही केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. घरातील सदस्यांबरोबर तुमचा वेळ आनंदात जाईल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामेही पूर्ण होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत अनुकून असणार आहे. तुम्ही जर नवीन व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यासाठी ही शुभ वेळ आहे. तुम्हाला जर एखादी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकता. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. नोकरी व्यवयासायात तुम्हाला प्रगतीची संधी आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तसेच, या काळात तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला आणि आनंदात जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
या राशीच्या लोकांवर देखील शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. तुमच्या जीवनत अनेक प्रगतीच्या संधी निर्माण होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळेल. या दरम्यान तुमच्या पगारात वाढ होण्याची देखील शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :