Taurus Weekly Horoscope 29 April to 5 May : राशीभविष्यानुसार, वृषभ राशीचा हा आठवडा कठीण काळाचा असणार आहे. लव्ह लाईफमधील समस्या सोडवण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, पण तुम्हाला तुमच्या खर्चावर लगाम ठेवावा लागेल. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. एकूणच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)
तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. या आठवड्यात जोडीदारासोबत तुमचे किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व वाद सोडवावे लागतील. जास्त वाद झाल्यास तुम्ही थोडं शांतीत घ्या. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला तुमच्या घरातल्यांशी भेटवायचं असेल आणि लग्नाबद्दल बोलायचं असेल तर हा आठवडा चांगला आहे. काही लोकांच्या प्रेमाचं रुपांतर प्रेमविवाहात होईल.
वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या ऑफिसमध्ये एखादी कल्पना मांडताना काळजी घ्या. कदाचित तुमच्या काही वरिष्ठांना ही गोष्ट आवडणार नाही आणि ते तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील. याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होईल. ऑफिसमध्येही वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. वकील, नोकरदार, वास्तुविशारद, प्राध्यापक, लेखक, कलाकार, स्वयंपाकी आणि कॉपीरायटर यांना या आठवड्यात यश मिळेल.
वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणांहून पैसे मिळतील. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आठवड्याचे दोन-तीन दिवस चांगले असणार आहेत. व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील, पण सर्व अभ्यास करुनच गुंतवणूक करा. महिलांना काही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. या आठवड्यात तुमच्याकडून काही व्यवहार चुकू शकतात, त्यामुळे पैशाचे व्यवहार जपून हाताळा.
वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)
तुमचं आरोग्य या आठवड्यात चांगलं असेल. ज्यांना शुगरचा त्रास आहे, त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. जेवताना तुमच्या ताटात जास्त भाज्या असाव्यात. या आठवड्यात तुम्ही सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत अधिक वेळ घालवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :