Nashik Accident News नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात उपस्थित राहिल्यानंतर घराकडे जाणाऱ्या घोडीचा शहरातील त्र्यंबक नाका सिग्नलवर (Trimbak Naka Signal) भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की,  दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. एकच्या सुमारास पुन्हा आपल्या घरी परतत असताना त्र्यंबक नाका सिग्नलवर घोडी आणि सोबतचे दुचाकीस्वार थांबले होते.


मर्सिडीजची घोडीला जोरदार धडक 


सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असताना सिग्नल तोडून आलेली मर्सिडीज (Mercedes) कारने (एमएच 15, डीएस 7564)  घोडीला जोरदार धडक दिली. यामुळे घोडी उंचावर उधळली गेली अन् जोरदार आवाज करत रक्ताच्या थारोळ्यात पडली. या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असून मर्सिडीज कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 


कार चालकावर कठोर कारवाईची मागणी 


घटनेची माहिती मिळताच पोलीस (Nashik Police) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मर्सिडीज कार ताब्यात घेतली आहे. कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी घोडीच्या मालकाने केली आहे. अपघातामुळे त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात काही काळ वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे दिसून आले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Salman Khan House Firing :  सलमान खान घरावर गोळीबार प्रकरण; पंजाबमधून उचलेल्या आरोपींचे बिष्णोई गँगसोबत कनेक्शन?


Bhandara Crime News : एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी फोडली चक्क दहा दुकानं; दोन संशयितांना अटक