Taurus  Weekly Horoscope 25 Feb To 2 March 2024 : राशीभविष्यानुसार, हा आठवडा वृषभ राशीसाठी अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात तुमची रखडलेलली सर्व  कामे पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. 


वृषभ राशीचे लव्ह लाईफ (Taurus Love Life Horoscope) 


वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा आनंददायी असेल. विवाहितांनी आपल्या जोडीदाराला वेळ द्याय  तुमच्या व्यस्त शेड्युलमधून काही वेळ तुमच्या जोडीदारासाठी काढा.  तरुणांनी प्रेमप्रकरणात विचार करुनच पुढे जावे अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांनासामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही आधीपासून प्रेमसंबंधात असाल तर तुमचा तुमच्या  जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत गैरसमज निर्माण होऊ देऊ नका, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहित लोक आपल्या जोडीदाराच्या  आरोग्यामुळे चिंतेत राहतील.


वृषभ राशीचे करिअर (Taurus Career  Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला जाणार आहे. तुम्ही जर परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात ग्रह-ताऱ्यांच्या प्रतिकूल स्थितीमुळे तुम्हाला अजून प्रतीक्षा करावी लागेल.मात्र तुम्ही  प्रयत्न करणे सोडू नका. इच्छित यश मिळविण्यासाठी, आळस आणि गर्व सोडून कठोर परिश्रम करावे लागतील.


वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope) 


या  आठवड्यात सुरुवातीपासूनच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा, गरजेच्या वेळी तु्म्हाला पैशांची कमतरता भासू शकते. ज्यामुळे तुम्ही कर्जावर पैसे घेऊन अतिरिक्त ताण सहन करू शकता. वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणालाही पैसे देणे टाळावे. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चढ-उतार दिसतील. करिअर-व्यवसायात तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.


वृषभ राशीचे आरोग्य  (Taurus Health Horoscope)


या आठवड्यात  तुमचे आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील. या आठवड्यात तुम्ही उत्साही राहाल  तुम्हाला जुनाट आजारांपासूनही तुम्हाला या आठवड्यात आराम मिळेल,  आराम  या आठवड्यात तुमचा मूड प्रसन्न राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :