Taurus Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल असेल. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांचं त्यांच्या प्रियकराशी लग्न ठरू शकतं. तुम्हाला या आठवड्यात चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळू शकते. आरोग्य आणि संपत्तीच्या बाबतीत हा आठवडा उत्तम राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)
या आठवड्यात जोडीदाराशी अनावश्यक वाद घालू नका, जोडीदाराची काळजी घ्या. नात्यातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. नातं घट्ट कसं होईल याचा विचार करा. या आठवड्यात काही जणांच्या प्रेमसंबंधाला घरातून मान्यता मिळेल. लवकरच तुमच्या प्रियकराशी तुमचं लग्न ठरण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांनी ऑफिसमध्ये लफडी करू नये, यामुळे वैवाहिक जीवन बिघडू शकतं. जे तरुण अजूनही एकटे असतील त्यांच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते.
वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)
तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्नात असाल तर आत्मविश्वासाने मुलाखतीला जा, या आठवड्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. नवीन आठवड्यात तुम्हाला चांगल्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळेल.परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या आठवड्यात काही चांगली अपडेट मिळू शकते. नोकरदारांनी या आठवड्यात कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. सर्व कामं अत्यंत काळजीपूर्वक हाताळा. व्यावसायिकांना या आठवड्यात व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. आयटी व्यावसायिक काही कामासाठी परदेशात जातील.
वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)
या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. दीर्घकाळापासून एखाद्याकडे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. काही लोक विचारपूर्वक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतात. या आठवड्यात तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. मुलांच्या लग्नात पैसा खर्च होऊ शकतो. या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यावर पैसे खर्च होऊ शकतात.
वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. परंतु, काही लोकांना सर्दी, ताप किंवा घसादुखीचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. वृषभ राशीच्या गरोदर महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. बस किंवा ट्रेनमधून उतरताना विशेष काळजी घ्या. तेलकट आणि जंक फूड खाऊ नका. आपल्या आहारात शक्य तितक्या हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: