Weekly Horoscope 10-16 March 2024 : मार्च महिन्याचा नवीन आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मार्चचा नवीन आठवडा (10 March To 16 March Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
तूळ रास (Libra)
तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही मित्रांसोबत अधिक वेळ घालवाल. भावंडांसोबत तुमचं चांगलं जमेल. आठवड्याच्या मध्यात घरात आनंदी वातावरण असेल, तुम्ही काही पार्टी वगैरे करू शकतात. तुम्ही घरबसल्या कोणत्याही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आणि कठोर परिश्रम कराल. चांगल्या कामामुळे तुमचे बॉस तुमची प्रशंसा करतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये लव्ह लाईफ तणावाची असेल, जोडीदारासोबत तुमचे वाद होतील. शक्यतो भांडणं टाळा. तब्येतीची काळजी घ्या, तुमचं पोट खराब होऊ शकतं.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही आकस्मिक लाभ मिळाल्याने ते आनंदी राहतील. तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं राहील, जोडीदाराशी जवळीक वाढेल. चांगल्या परस्पर ट्यूनिंगमुळे घरातील वातावरण देखील सकारात्मक असेल. व्यवसायात हा काळ प्रगतीचा असेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सर्वांसोबत चांगला वेळ जाईल. तुमच्या बोलण्याच्या शैलीने तुम्ही लोकांवर प्रभाव टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही फिरायला जाऊ शकता, तुम्हाला मित्रांसोबत वीकेंडचा आनंद लुटता येईल. नवीन आठवड्यात तुम्ही व्यवसायात धोका पत्करण्याचा प्रयत्न कराल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रास होईल. तुमचा मानसिक ताण वाढेल, तुमची तब्येत देखील बिघडू शकते, त्यामुळे सावध राहा. आठवड्याच्या मध्यात तुमची तब्येत सुधारेल. रखडलेली कामं पुन्हा सुरू होतील. तुमचं वैवाहिक जीवन सुधारेल. व्यवसायात अडकलेली कामं आता पूर्ण होऊ लागतील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. वीकेंडला तुम्ही घरी पार्टीचं आयोजन करू शकता. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. सासरच्या मंडळींसोबतही चांगलं जुळवून घेता येईल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला चांगली राहील. सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं असेल. तुम्हाला जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. तरुणांची लव्ह लाईफही चांगली असेल. व्यवसायात प्रगती होईल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढेल. हा आठवडा तुम्ही कामात व्यस्त राहाल. व्यवसायाच्या निमित्ताने लांबचा प्रवास होऊ शकतो. या आठवड्यात तुमचं आरोग्य नाजूक राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही मौजमजा कराल. वैवाहिक जीवन देखील आनंदाने भरलेलं असेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील, परंतु तुमच्या मनात एखादी गोष्ट सतत खटकत राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल, पैशांची आवक वाढेल. कामात जी निराशा होती ती दूर होऊन तुमचं कामात मन लागेल. लव्ह लाईफ चांगली राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढतील. तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो. या आठवड्यात तुम्ही परदेशात प्रवासाचा विचार करू शकता.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात चांगली राहील. तुम्ही लांब फिरायला गेला की तुमचं मन प्रसन्न होईल. नोकरीच्या ठिकाणी कामात बदल होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात करिअरवर लक्ष केंद्रित करावं लागेल, तुम्ही खूप मेहनत घ्याल, तुमची कामगिरी सुधारेल. वैयक्तिक जीवनातही सुधारणा होईल. तुमच्या मुलांमुळे तुम्ही खुश व्हाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत वैवाहिक जीवन सुखाचं असेल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: