Taurus July Monthly Horoscope 2025: वृषभ राशीसाठी 13 जुलै नंतर सावधानतेचा इशारा; या महिन्यात नेमकं काय घडणार? मासिक राशीभविष्य वाचा
Taurus July Monthly Horoscope 2025: वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

Taurus July Monthly Horoscope 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै 2025 महिना लवकरच सुरु होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जुलै महिना खूप खास असणार आहे. हा महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Horoscope Love Life July 2025)
प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, प्रेम जीवनात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल, परंतु कामाचा ताण जास्त असल्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही, ज्यामुळे दुरावा येऊ शकतो. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना आनंददायी अनुभव येतील. जे अविवाहित आहेत त्यांना या महिन्यात नवीन जीवनसाथी मिळू शकतो. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो, ग्रहांची स्थिती अनुकूल नसल्याने नात्यात कमकुवतपणा येऊ शकतो.
वृषभ राशीचे करिअर (Taurus Horoscope Career July 2025)
करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नोकरदारांसाठी हा काळ थोडा चांगला राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा आणि त्यांच्या सूचनांचा आदर करा. करिअरच्या दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात अनुकूल असेल, परंतु 13 जुलै नंतर काही अडथळे समोर येऊ शकतात. या महिन्यात अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. बुध तिसऱ्या घरात असल्याने उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून मदत मिळेल. आत्मविश्वास वाढेल, परंतु कठोर परिश्रम अधिक करावे लागतील.
वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Horoscope Wealth July 2025)
आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, जुलै महिन्यात कौटुंबिक मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता देखील आहे. खर्चात वाढ तुम्हाला चिंतेत टाकू शकते. 28 जुलै नंतरची परिस्थिती सुधारेल.
वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Horoscope Health July 2025)
वृषभ राशीच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, या महिन्यात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. मंगळ आणि केतूची स्थिती तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. कामानंतर लगेचच तुम्हाला थकवा जाणवू शकतो. हंगामी आजार आणि त्वचेशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्थिरता देखील जाणवू शकते.
हेही वाचा :
July 2025 Monthly Horoscope: जुलै महिना तुमच्यासाठी कसा जाणार? आर्थिक स्थिती, करिअर, प्रेम संबंध कसे असतील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















