Taurus Horoscope Today 11 May 2023 : कामाच्या ठिकाणी स्पष्टवक्तेपणा टाळा, खर्च जपून करा; वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र
Taurus Horoscope Today 11 May 2023 : आज खर्चाची बाजू सांभाळा. समाजसेवा करताना स्पष्टवक्तेपणा टाळा.
Taurus Horoscope Today 11 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार (Employees) लोक नोकरीत (Job) पदोन्नतीकडे वाटचाल करतील. आज तुमचे थांबलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुमची रखडलेली कामे पूर्ण करा. तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर करा. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. आज काही कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. आज व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. आज खर्चाची बाजू सांभाळा. समाजसेवा करताना स्पष्टवक्तेपणा टाळा. आज मैत्रीचे नाते अधिक घट्ट होईल. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आरोग्याबाबत (Health) जागरुक राहा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात.
आज वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांना चांगली बातमी मिळेल. तसेच, आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. त्यामुळे तुमच्या आत एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल. व्यावसायिकांना आज थोडे विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. आज तुमच्या निर्णयांच्या जोरावर तुम्ही इतरांचे मन जिंकू शकता. नोकरी (Job) व्यवसायात कामाकडे दुर्लक्ष करू नका. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे.
वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबात काही धार्मिक कार्य किंवा धर्माची चर्चा होऊ शकते. आज तुमच्या घरी जवळच्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. तुम्ही संध्याकाळ हसत-खेळत घालवाल.
आज वृषभ राशीचे आरोग्य
जोखमीच्या कामात स्वत:ला गुंतवू नका, दुखापत होण्याची शक्यता आहे. आज गाफील राहू नका, त्रास वाढू शकतो.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
संकटमोचन हनुमानजीचे पठण फायदेशीर ठरेल. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत राहा.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :