Swapna Shashtra : स्वप्नात गणपती बाप्पा दिसले तर समजून जा की...! जाणून घ्या स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?
Swapna Shashtra : कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजनाने होते. स्वप्नात गणेशाची मूर्ती पाहणे खूप शुभ मानले जाते. जाणून घ्या स्वप्नात गणेशाचे दर्शन घेणे कोणते शुभ लक्षण आहेत?
Swapna Shashtra : स्वप्नशास्त्रात (Dream Interpretation) अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याबाबत आपल्याला कदाचित माहित नसाव्यात. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नात शुभ किंवा अशुभ होण्याचे संकेत मिळतात. बहुतेक लोकांना रात्री झोपताना स्वप्ने पडतात. काही स्वप्ने चांगली असतात तर काही खूप वाईट असतात. स्वप्नात श्रीगणेशाचे (Lord Ganesh) दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते. भगवान गणेश ही सुख, समृद्धी आणि बुद्धीची देवता आहे.
स्वप्नात श्री गणेशाचे दर्शन घेणे म्हणजे शुभ!
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात श्री गणेशाचे दर्शन घेणे म्हणजे गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव होणार आहे. गणपती बाप्पाची पूजा करून व्रत केल्याने मनुष्याला ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते. स्वप्नात गणेशाची मूर्ती पाहणे देखील शुभ असते. जाणून घ्या स्वप्नात गणेशाचे दर्शन घेणे कोणते शुभ लक्षण आहेत?
स्वप्नात श्रीगणेश पाहण्याचा अर्थ
स्वप्नात गणेशाचे दर्शन होणे म्हणजे तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे.
गणपतीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे.
तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल.
स्वप्न किती शुभ आणि फलदायी आहे, हे तुम्ही कोणत्या वेळी स्वप्न पाहिले यावरही अवलंबून असते.
दुपारी झोपताना स्वप्नांचा फायदा होत नाही. रात्री 12 ते 3 च्या दरम्यान स्वप्न पाहणे शुभ मानले जाते.
जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये गणेशाचे स्वप्न पाहिले असेल तर ते खूप शुभ आहे.
असे म्हणतात की या स्वप्नाचे फळही लवकर मिळते.
स्वप्नात गणपती येणे म्हणजे आता तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत.
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात श्रीगणेश घोड्यावर स्वार झालेले दिसले तर याचा अर्थ तुम्ही प्रवासाला जाऊ शकता.
स्वप्नशास्त्रानुसार अशा प्रकारची स्वप्ने कोणाशीही शेअर करू नयेत. असे केल्याने शुभफल मिळत नाही.
स्वप्नात श्रीगणेश दिसल्यास याचा उल्लेख कोणाशीही करू नका, अन्यथा शुभ परिणामांपासून वंचित राहाल.
प्रत्येक स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ
स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा असतो.तसे स्वप्न पाहणे ही सामान्य गोष्ट आहे. पण काही स्वप्ने चांगली असतात तर काही खूप वाईट. तुम्हाला तुमच्या स्वप्नात काय दिसले? याचे वेगळे अर्थही असू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
इतर बातम्या