Sun Transit In Capricorn 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतात. सूर्य देखील या नऊ ग्रहांपैकी एक आहे. सूर्य (Sun) दर महिन्याला राशी बदलतो, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतोच.


नवीन वर्षात, म्हणजेच 15 जानेवारीला सूर्य शनिच्या मकर राशीत प्रवेश करत आहे. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य 15 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 32 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने काही राशींना विशेष फायदा मिळू शकतो. सूर्याच्या मार्गक्रमणाचा कोणत्या राशींना विशेष फायदा मिळणार? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


सूर्य मेष राशीच्या पंचम भावाचा स्वामी असून तो दहाव्या भावात प्रवेश करणार आहे, या वेळी मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्याचबरोबर तुमची मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसायात अफाट यशासह नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढून पैशाची बचत देखील होईल. व्यवसायात तुम्हाला मोठी डील मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. लव्ह लाईफही चांगली राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. यासोबतच आरोग्यही चांगले राहणार आहे.


सिंह रास (Leo)


सिंह राशीत सूर्य हा पहिल्या भावाचा स्वामी असून तो मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सहाव्या भावात येत आहे. अशा स्थितीत, सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगले यश मिळेल. तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात, यासोबतच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीने मान-सन्मानही वाढेल. यासोबतच तुम्ही तुमच्या कामातून एक वेगळी ओळखही निर्माण करू शकाल. व्यवसायिक क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे, दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या करारावर आता स्वाक्षरी मिळू शकते. व्यवसायात बऱ्याच काळापासून येत असलेल्या अडचणी आता दूर होतील. त्याचबरोबर कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, गुंतवणूक आणि सट्टेबाजी करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. त्याचबरोबर आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.


मीन रास (Pisces)


मीन राशीत सूर्य सहाव्या भावाचा स्वामी असून तो अकराव्या भावात प्रवेश करत आहे. अशावेळी या राशीच्या लोकांना धनलाभ मिळू शकतो. चांगले यश मिळेल. करिअरसाठी हा काळ खास असणार आहे, यासोबतच प्रमोशनही मिळू शकते. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल, यामुळे आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील. व्यवसायात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. या काळात तुमचे जोडीदारासोबतचे संबंध खूप मजबूत होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shaniwar Upay : 2024 वर्षाच्या पहिल्या शनिवारी सर्वार्थ सिद्धी योग; 'या' उपायांनी दूर होणार शनीचा त्रास, होईल धनलाभ