(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surya Upasna : 'या' वस्तू आणि मंत्रांनी सूर्याला जल अर्पण करा, जीवनात सुख-समृद्धी मिळेल!
Surya Dev Puja on Sunday : खऱ्या भक्तीभावाने सूर्यदेवाची नित्य पूजा केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
Surya Dev Puja on Sunday : हिंदू धर्मात सूर्यदेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सुर्याला जगाचा तारणहार म्हणतात. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना करून उपवास केल्याने भाविकांना आशीर्वाद मिळतो. खऱ्या भक्तीभावाने सूर्यदेवाची नित्य पूजा केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
या वस्तू आणि मंत्रांनी सूर्याला जल अर्पण करा, जीवनात सुख-समृद्धी मिळेल
करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि यश मिळवायचे असेल, तर सूर्यदेवाची पूजा करावी. कारण ज्योतिषी सांगतात की ज्या लोकांचा सूर्य बलवान असतो, त्यांना नोकरी-व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही. भक्तांनी या मंत्रांचा जप केला पाहिजे आणि सूर्यदेवाला प्रार्थना आणि अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
सूर्य पूजा मंत्र
एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते।
अनुकम्पय मां देवी गृहाणार्घ्यं दिवाकर।।
सूर्य मंत्र - ऊँ खखोल्काय स्वाहा
यानंतर गायत्री मंत्राचा जप करा.
ॐ ॐ ॐ ॐ भूर् भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं।
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ।।
यानंतर भगवान विष्णूचे स्मरण करून खालील मंत्राचा जप करा.
शांता कारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम।
विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम।
लक्ष्मी कान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।"
सूर्यपूजेमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा
-सूर्यदेवाची उपासना नियमित करावी.
-पूजेनंतर सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करावे.
-सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करावा.
-भगवान भास्कराच्या पूजेमध्ये लाल फुले, फळे, धूप-दीप, दूर्वा इत्यादी अर्पण करा.
-पूजेच्या वेळी आरती करावी.
-सूर्यदेवाची पूजा आटोपल्यानंतर ब्राह्मणांना दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...