Sun And Jupiter Conjunction In Taurus : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलतात आणि इतर ग्रहांसोबत येऊन युती करतात, ज्याचा परिणाम संपूर्ण मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. आता अशीच एक ग्रहांची युती मे महिन्यात होणार आहे. मे महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य आणि गुरूची युती होणार आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यांना या युतीमुळे नवीन नोकरी मिळू शकते आणि त्यांची व्यवसायात प्रगती होऊ शकते. या भाग्यशाली राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया
सिंह रास (Leo)
सूर्य आणि गुरूची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या कर्म घरात तयार होणार आहे . त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची चांगली प्रगती होऊ शकते. करिअरच्या आघाडीवरही तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि तुमची व्याप्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यापैकी अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. या काळात व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं. तसेच काहींची इच्छित ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुची युती अनुकूल ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या घरात घडणार आहे. त्यामुळे या वेळी तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल, तर नोकरीत तुमच्या नवीन रणनीती यशस्वी होतील आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही असंख्या संपत्ती जमवाल आणि तुम्हाला देशांतर्गत किंवा विदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकेल.
कर्क रास (Cancer)
गुरु आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा संयोग तुमच्या कुंडलीतील उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी तयार होत आहे, त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळेल. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्ही नवीन गाडी किंवा जमीन खरेदी करू शकता आणि स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :