Mercury Transit Budh Margi : ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. सध्या बुध मेष राशीत वक्री चाल चालत आहे. यानंतर 25 एप्रिलला बुध मीन राशीत सरळ चाल चालेल. बुधाची ही सरळ चाल ऑगस्टपर्यंत राहणार आहे.
बुध ग्रहाच्या या स्थितीचा काही राशींना मजबूत फायदा होईल. या 4 महिन्यांच्या काळात काही राशींचं भाग्य उजळेल. बुधाच्या संक्रमणामुळे या राशींना प्रचंड लाभ होऊ शकतो. बुधाच्या सरळ चालीमुळे नेमका कोणत्या राशींचा (Zodiac Signs) चांगला काळ सुरू होणार? जाणून घेऊया.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं मार्गक्रमण शुभ ठरणार आहे. बुधाच्या या चालीमुळे सिहं राशीचा चांगला काळ सुरू होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये केलेल्या योजना यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना बुध ग्रहाच्या कृपेने त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्हाला काही मोठी जबाबदारी देखील मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यशस्वी होतील. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाची थेट चाल लाभदायक मानली जाते. करिअरच्या दृष्टिकोनातून, तुमच्यात काही चांगली कौशल्यं निर्माण होतील. धार्मिक कार्यात अधिक रस राहील. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि मित्रांचं सहकार्य लाभेल. यासोबतच अनेक कामं पूर्ण करून तुम्हाला सामाजिक क्षेत्रातही सन्मान आणि ओळख मिळू शकेल. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक फायदा होईल.
धनु रास (Sagittarius)
बुधाची सरळ चाल धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानली जाते. जीवनात सतत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. समाजातील लोकांना आकर्षित करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. इतरांपेक्षा वेगळा विचार करून नेतृत्वाच्या दिशेने तुमची पावलं पडतील. या काळात प्रवासाचीही शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :