Astrology : विद्यार्थ्यांना सतावतेय परीक्षेची भीती? ज्योतिषशास्त्रानुसार करा हे उपाय, भगवान विष्णूची होईल कृपा!
Guruwar Upay Astrology : विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान कोणत्या प्रकारची भीती सतावत असेल, तर त्यांनी गुरुवारी हे उपाय करावेत, कारण या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे.
Guruwar Upay Astrology : सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची (Exam) वेळ असून, ती जवळ येताच विद्यार्थ्यांमध्ये चांगले क्रमांक मिळविण्यासाठी उत्साह दिसून येतो. त्यासाठी ते खूप मेहनतही करतात, मात्र तरीही काही विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबाबत खूप भीती असते, पेपर कसा जाईल? अभ्यास कसा होईल? असे विविध प्रकारचे प्रश्न त्यांना या काळात पडतात. दरम्यान, ज्योतिषशास्त्रात गुरुवार म्हणजेच गुरुवार हा भगवान विष्णूला (Lord Vishnu) समर्पित मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुम्हाला अभ्यास आणि नोकरीच्या क्षेत्रात यश मिळू शकते. जाणून घ्या उपाय
गुरु बलवान असेल तर शिक्षणातील अडचणी दूर होतात
ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये गुरु हा सर्वात मोठा ग्रह मानला गेला आहे. जो ज्ञानाचा कारक आहे. म्हणूनच ज्या लोकांचा बृहस्पति (गुरू) अशुभ आहे, त्यांना गुरुवारी पूजा करण्याचा आणि उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. गुरु बलवान असेल तर शिक्षणातील अडचणी दूर होतात. गुरुवारी काही विशेष उपाय केल्यास तुम्हाला अभ्यास आणि नोकरीच्या क्षेत्रात यश मिळू शकते.
परीक्षेपूर्वी गुरुवारी हा उपाय करा, ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?
-जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा.
-परीक्षेला जाताना किंवा घरातून बाहेर पडताना वाटेत गाईला मैदा आणि गूळ खाऊ घाला.
-या दिवशी गाईला हिरवा चारा चारला तर परीक्षेत चांगले गुण मिळतात.
-जर तुमच्या कुंडलीत गुरुची दशा अशुभ असेल तर गुरुवारी मंदिरात केशर आणि हरभरा डाळ दान करा.
-मुलांनी परीक्षेला जाताना कपाळावर कुंकू लावावे.
-गुरुवारी अंघोळ करताना पाण्यात थोडी हळद मिसळावी. हा उपाय केल्याने तुमचे अडकलेले काम पूर्ण होते.
-त्यामुळे तुम्हीही परीक्षेत यश मिळवण्यासाठी हे छोटे उपाय करा, आणि मेहनत करा, तुम्हाला तुमच्या परीक्षेत कोणत्याही भीतीशिवाय नक्कीच यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या