Solar Eclipse 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज, म्हणजेच 8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण (Surya Grahan 2024) होत आहे. या दिवशी मीन राशीत चार ग्रह मिळून चतुर्ग्रही योग निर्माण करणार आहेत. आज मीन राशीत सूर्य, बुध, राहू, शुक्र एकत्र येणार आहेत, यामुळे मीन राशीत चतुर्ग्रही योग तयार होईल. हा योगायोग तब्बल 500 वर्षांनंतर घडणार आहे, यामुळे आजपासून काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच, त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घ्या


सूर्यग्रहण 'या' राशींसाठी ठरणार शुभ


मेष रास


सूर्यग्रहणाच्या काळात चार ग्रहांचं एकत्र येणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या चार ग्रहांच्या युतीमुळे तुम्हाला चांगले दिवस येतील. अनपेक्षित धनलाभ होईल. व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. तसेच नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडूनही सहकार्य मिळेल. विद्यार्थी या काळात शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती करतील.


सिंह रास (Leo)


सूर्यग्रहणादरम्यान होत असलेला 4 ग्रहांचा संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं आणि कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्हाला कुठूनतरी प्रलंबित पैसे मिळू शकतात.या काळात तुम्ही काही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो.


धनु रास (Sagittarius)


सूर्यग्रहणाच्या दिवशी होत असलेला चार ग्रहांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. यावेळी तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल आणि तुमच्या नियोजित योजना यशस्वीपणे पूर्ण कराल. तुम्ही नवीन लोकांशी संपर्कात याल, ज्यांच्याशी तुमचं नातं जुळू शकतं, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. नोकरदार लोक पगार वाढीसाठी दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. अविवाहित लोकांना चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात, ज्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज चतुर्ग्रही योगासह बनले अनेक शुभ योग; पाडव्याच्या मुहूर्तावर मेषसह 'या' 5 राशींना होणार धनलाभ, पगारवाढीचेही संकेत