IB Recruitment 2024 Registration : सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोनं (Intelligence Bureau Of Recovery) बंपर भरती जाहीर (IB Recruitment 2024 Announced) केली आहे. 600 हून अधिक पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी तुम्ही अर्ज करु शकता. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला mha.gov.in. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल
इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 660 पदांवर भरती
गृह मंत्रालयाकडून इंटेलिजेंस ब्युरोमध्ये विविध पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 660 विविध रिक्त पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), सामान्य केंद्रीय सेवा (JIO), SA अशा विविध पदांवर भरती केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला IB वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल. यानंतर अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.
IB Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 30 मार्च 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 29 मे 2024
IB Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता (Educational Eligibility)
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे आणि सुरक्षा किंवा गुप्तचर विभागात दोन वर्षांचं अनुभव असणे आवश्यक आहे.
IB Recruitment 2024 : पगार किती मिळेल?
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला पद आणि पात्रतेनुसार 19,900 रुपये ते 1,51,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
IB Recruitment 2024 : वयोमर्यादा (Age Limit)
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी आहे. मात्र, उमेदवाराचे वय 54 वर्षापेक्षा जास्त नसावे. सविस्तर माहितीसाठी तुम्हाला अधिकृत अधिसूचना तपासावी लागेल.
IB Recruitment 2024 : अर्जशुल्क (Application Fee)
या भरतीसाठी उमेदवाराला 450 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ओबीसी आणि EWS उमेदवाराला शु्ल्कात 100 रुपये सवलत मिळेल.
IB Recruitment 2024 : अर्ज कुठे पाठवायचा?
या पदांसाठी अर्ज ऑफलाइन प्रक्रियेने स्वीकारण्यात येईल. तुम्ही वेबसाइटवर दिलेल्या नोटिसमधून प्रोफॉर्मा डाउनलोड करा आणि तो भरा आणि खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत म्हणजेच 29 मे 2024 आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संयुक्त उप निदेशक/जी-3, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021.
अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.