Somvati Amavasya 2024 : हिंदू वर्षातील शेवटचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्या. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जाणार आहे. हा विशेष दिवस शंकराची पूजा, स्नान, दान आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान आणि दान करणाऱ्यांच्या पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते, सुख प्राप्त होते आणि सौभाग्य वाढते.
यावर्षी सोमवती अमावस्या तिथी 8 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी संपेल. त्याच वेळी, यंदा अमावस्येच्या दिवशीच सूर्यग्रहण देखील होत आहे. यावर्षी ग्रहण 8 एप्रिलला रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे 2 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होईल.
सोमवती अमावस्येला बनत असलेला ग्रहणाचा योग काही राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरेल, तर या काळात काही राशीच्या लोकांच्या सुख आणि सौभाग्यात वाढ होईल. सोमवती अमावस्येला जुळून आलेल्या अद्भूत योगायोगामुळे कोणत्या राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळेल? जाणून घेऊया
अमावस्येला 'या' राशींचं भाग्य उजळणार
वृषभ रास (Taurus)
सोमवती अमावस्येमुळे वृषभ राशीच्या लोकांचं आयुष्य सुखाने भरेल, तुमचं सौभाग्य वाढेल. करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही भौतिक सुखसोयींनी भरलेलं जीवन जगाल. तुमचं उत्पन्न वाढेल. कामातील अडथळे दूर होतील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना सोमवती अमावस्येला बनत असलेल्या शुभ संयोगांचा मोठा फायदा होईल. यावेळी ज्यांचं लग्न नाही झालं त्यांचं लग्न ठरू शकतं. तरुणाईच्या प्रेमसंबंधात गोडवा राहील. घरात पैशाची आवक वाढेल. नोकरदार लोकांची पदोन्नती होईल किंवा पगारवाढ होण्याची शक्यता वाढेल. नोकरी-व्यवसायात तुमची प्रगती होईल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्येचा दिवस शुभ ठरेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. घरात पैशाची आवक वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित रखडलेली कामं सुरू होतील. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. तुम्हाला वारसाहक्काने मालमत्ता मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
कुंभ रास (Aquarius)
सोमवती अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा ठरेल. या काळात आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठं यश मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :