एक्स्प्लोर

Shukra Transit 2026: ऑगस्ट ते सप्टेंबर..4 राशींनी पैसा जपून ठेवा, संयमाचा काळ! शुक्र घेणार परीक्षा, मागोमाग संकट? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात खळबळ?

Shukra Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 4 राशी अशा आहेत. ज्यांना 2 सप्टेंबरपर्यंत अडचणींचा सामना करावा लागेल, कारण शुक्र त्यांची परीक्षा घेणार आहे!

Shukra Transit 2026: श्रावण महिना अवघ्या काही दिवसांतच सुरू होतोय, सोबत 2026 वर्षातील आठवा महिना ऑगस्टही सुरू होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांचे गोचर होईल. या महिन्यात, सुख आणि समृद्धी देणारा शुक्र ग्रह देखील आपली राशी बदलणार आहे. या काळात ते म्हणतात ना, संकट कधीच सांगून येत नाही, अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होणार आहे, याचाच अर्थ 4 राशी अशा आहेत. ज्यांना थेट ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत अडचणींचा सामना करावा लागेल, कारण शुक्र त्यांची परीक्षा घेणार आहे, जाणून घ्या त्या राशींबद्दल, यात तुमची रास तर नाही ना?

4 राशीच्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज...(Shukra Transit 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, 1 ऑगस्ट रोजी, श्रावण महिन्यात, शुक्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल, जिथे तो दुर्बळ होईल. हे संक्रमण 2 सप्टेंबरपर्यंत चालेल. ज्योतिषांच्या मते, 4 राशीच्या लोकांना या काळात विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या चार राशींच्या जीवनात आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात, त्यामुळे शहाणपणाने निर्णय घ्या. शुक्राचे हे भ्रमण अनेक राशींसाठी खूप महत्त्वाचे असेल. अनेक राशींना या भ्रमणाचे शुभ परिणाम जाणवतील, परंतु ज्योतिषी 4 राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. सप्टेंबरपर्यंत या राशींच्या लोकांच्या जीवनात समस्या वाढू शकतात.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र संक्रमणाच्या काळात मेष राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात लपलेल्या शत्रूंपासून सावध रहा. तुमचा खर्च वाढू शकतो. या काळात कर्ज घेणे टाळा. आर्थिक निर्णय हुशारीने घ्या.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र संक्रमणाच्या काळात मिथुन राशीच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. घरात संघर्ष आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहने, घरे किंवा मालमत्तेसंबंधी निर्णय घेण्यास अडथळा येऊ शकतो. आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र संक्रमणाच्या काळात तूळ राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढू शकतो. पुढील महिन्याचे नियोजन करूनच प्रवास करा. या काळात आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र संक्रमणाच्या काळात मीन राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनावर आणि भागीदारी व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही भागीदारीत असाल, तर आर्थिक निर्णय हुशारीने घ्या.

हेही वाचा :

August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी 'ऑगस्ट' आयुष्याचा गेम पालटणार! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget