Shukra Shani Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतात, जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा विविध शुभ-अशुभ योगांची निर्मिती होते. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. यातच आता 28 मार्चला शनि मीन राशीत प्रवेश करेल, जिथे शुक्र आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत मीन राशीत शुक्र आणि शनीची युती होणार आहे. मीन राशीत ही युती तब्बल 30 वर्षांनी होईल. ज्यामुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


शुक्र आणि शनीची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची विशेष प्रगती होईल. जर तुम्हाला या काळात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातूनही हा योग तुमच्यासाठी शुभ ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच, उत्पन्नात वाढ होऊ शकते. शेअर बाजार, रिअल इस्टेट किंवा व्यवसायाशी संबंधित लोक चांगला नफा कमवू शकतात. परदेश प्रवास किंवा कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे व्यवसायात फायदा होऊ शकतो.


मकर रास (Capricorn)


शनि आणि शुक्राची युती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. या काळात तुमची संवाद कौशल्य चांगली राहतील. तसेच तुमचं आरोग्यही सुधारेल. त्याच वेळी तुमचं कार्यही कौतुकास्पद राहील. या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. ज्या लोकांचं काम किंवा व्यवसाय मीडिया, मार्केटिंग, बँकिंगशी संबंधित आहे त्यांना विशेष लाभ मिळू शकतात. या काळात तुमचं धाडस आणि शौर्य वाढेल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडूनही सहकार्य मिळेल.


मीन रास (Pisces)


शुक्र आणि शनीची युती तुमच्यासाठी भाग्याची ठरेल. या काळात कौटुंबिक संबंध सुधारतील. तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तसेच, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या काळात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. यावेळी, तुमचं वैवाहिक जीवन खूप छान असेल. तसेच, या काळात तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology : तब्बल वर्षभरानंतर शनीच्या राशीत सूर्य आणि बुधाची युती; 3 राशींचं भाग्य उजळणार, नोकरीत प्रमोशनसह पगारवाढीचे संकेत