Astrology : तब्बल वर्षभरानंतर शनीच्या राशीत सूर्य आणि बुधाची युती; 3 राशींचं भाग्य उजळणार, नोकरीत प्रमोशनसह पगारवाढीचे संकेत

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट वेळनंतर भ्रमण करतात आणि शुभ-अशुभ योग तयार करतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यातच आता 14 जानेवारीला सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि 24 जानेवारीला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करेल.

अशा स्थितीत 1 वर्षानंतर शनीच्या राशीत बुध आणि सूर्याचा संयोग तयार होणार आहे.
सूर्य आणि बुध युतीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं, त्यांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि बुध यांची युती फायदेशीर ठरू शकते. कारण हा योगायोग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या भाग्याच्या ठिकाणी घडणार आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुमची साथ देईल.
प्रलंबित कामात यश मिळू शकतं. तिथे तुम्ही छोट्या किंवा मोठ्या सहली करू शकता. तसेच नोकरदार लोकांना पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिक जीवनात मोठं यश प्राप्त होईल. व्यवसाय वाढेल आणि नवीन भागीदारीच्या संधी मिळतील.
मेष रास (Aries) : सूर्य आणि बुध यांचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची विशेष प्रगती होऊ शकते. तसेच, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते.
नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती या काळात मजबूत असेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. त्याचबरोबर व्यापारी वर्गाला यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
मकर रास (Capricorn) : सूर्य आणि बुधाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमची कार्यशैली सुधारेल. तुम्ही मोठ्या लोकांशी संबंध वाढवाल. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते आणि कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होतील.
घरात शांतता आणि सौहार्द राहील. तसेच, विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान असेल. यावेळी अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं नातं मजबूत होईल.