Shukra Rashi Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे राशी बदल ठराविक वेळेवर होत असतात. ग्रहांच्या बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होतो. 18 जून रोजी शुक्र राशी बदलेल. शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. तर बुध आधीच वृषभ राशीत बसला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा बुध आणि शुक्र एकाच राशीत असतात. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होतो.


ज्योतिषशास्त्रात दुर्मिळ योग


ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सुख, सुविधा, कला, साहित्य आणि उपभोग यांचा कारक ग्रह मानले जाते. कुंडलीत शुक्रदेव उच्च स्थानी बसले असतील तर, त्या व्यक्तीला यशाच्या शिखरावर घेऊन जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. लक्ष्मी नारायण योग हा ज्योतिषशास्त्रात दुर्मिळ योग मानला जातो. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यावेळी शुक्र बलवान होतो आणि स्वतःच्या राशीनुसार शुभ लाभ देतो. मात्र यावेळी हा मोठा योगायोग आहे, कारण येथे बुध आधीच विराजमान आहे. बुध आणि शुक्र एकाच राशीत असताना लक्ष्मी नारायण योग तयार होतोय, वृषभ अनेक राशींसाठी हा योग फलदायी ठरेल. परंतु त्याचा मुख्य फायदा मुख्यतः 2 राशींवर होईल.


'या' राशींवर लक्ष्मी नारायण योगाचा प्रभाव


वृषभ : 18 जून ते 2 जुलै हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या काळात त्यांना व्यवसायात अधिक फायदा होईल. व्यवसायाच्या प्रगतीत यश मिळेल. जिथून आशा नाही तिथून धनलाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. त्याला बढती मिळू शकते. या राशीच्या लोकांच्या बुद्धीमत्तेत सुधारणा होईल. या दरम्यान त्यांच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल.


वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीचा लाभ होईल. स्पर्धा परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. जीवनसाथीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :