Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2025 चा दिवस फार खास असणार आहे. शुक्र (Shukra Gochar) ग्रहाला सौंदर्य, प्रेम आणि कलेचा कारक ग्रह मानला जातो. या दिवशी शुक्र ग्रह कन्या (Virgo) राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने अनेक राशींसाठी (Zodiac Signs) हा काळ फार शुभकारक असणार आहे. या दरम्यान काही लोकांच्या आयुष्यात गोडवा निर्माण होईल. तर, काहींना करिअरमध्ये उत्तम संधी मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या दुसऱ्या चरणात हे संक्रमण होतंय. त्यामुळे तुमच्या कुटुंबात सुख-शांतीची वाढ झालेली दिसेल. तसेच, घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. या काळात जर तुम्हाला एखादं नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्ही करु शकता. वाणीत गोडवा दिसून येईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. कामाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तसे, नातेसंबंध देखील घट्ट होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी शुक्र ग्रहाचं हे संक्रमण लाभदायी ठरणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फार सकारात्मक ठरणार आहे. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत भरभराट दिसून येईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. समाजात तुमची चांगली प्रतिमा दिसून येईल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी शुक्राचं संक्रमण फार लाभदायी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन लोकांशी तसेच, सहकाऱ्यांशी भेटीगाठी होतील. काही लोक या काळात नवीन व्यवसायाची देखील सुरुवात करु शकतात. तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी शुक्राचं संक्रमण फार रोमॅंटिक आणि शुभकारक असणार आहे. जे लोक विवाहित आहेत त्यांचा संसार चांगला सुरु राहील. नात्यात सामंजस्य दिसून येईल. तसेच, आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुमच्यासाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. तसेच, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :