Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाची दिवाळी (Diwali 2025) फार खास असणार आहे. कारण या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2025 रोजी शनि देव वक्री म्हणजेच उलटी चाल करणार आहेत. शनिची (Shani Dev) ही चाल मीन राशीत होणार आहे. न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनिची वक्री चाल हा फार दुर्लभ योग मानला जातो. यामुळे काही राशींना फार चांगला लाभ मिळणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी ही दिवाळी फार खास असणार आहे. या काळात शनि महाराजांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल. तसेच, आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. उत्पन्नासाठीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठीसुद्धा दिवाळीचा उत्सव फार चांगला असणार आहे. या दरम्यान तुमच्या करिअरवर आणि व्यवसायावर याचा शुभ परिणाम दिसून येईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तसेच, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भातील अनेक निर्णय तुम्ही या दिवशी घेऊ शकता. 

Continues below advertisement

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे शनिच्या वक्री चालीचा परिणाम मकर राशीवर देखील होणार आहे. या काळात तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी शनिची वक्री चाल लाभदायी ठरणार आहे. या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली दिसून येईल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. त्यामुळे शनिच्या वक्रीचा हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Samsaptak Yog 2025: अखेर दोन शत्रू ग्रह आमने-सामने! पॉवरफुल समसप्तक योग 'या' 3 राशींना श्रीमंत बनवूनच राहणार, गाडी, बंगला, पैसा होणार डबल..