Kantara Chapter 1 Box Office Collection: 'कांतारा चॅप्टर 1'नं (Kantara Chapter 1) रिलीजपासूनच बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) ताबा मिळवला आहे. तसेच, कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर, धमाकेदार कलेक्शन सुरू आहे. चित्रपट सातत्यानं धुवांधार कमाई करत आहे. पण, असं असलं तरीसुद्धा सोमवारी ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) दिग्दर्शित सिनेमाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. पण, तरीसुद्धा कमाईचे आकडे दिग्गजांच्याही तोंडाला फेस आणणारे आहेत.

Continues below advertisement

ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं सलग पाचव्या दिवशी (Kantara Chapter 1 Box Office Collection Day 5) हा टप्पा गाठलाय. 'कांतारा चॅप्टर 1'नं आधीच 250 कोटींचा टप्पा ओलांडलाय. आता, त्याचं पुढचं लक्ष्य 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणं आहे, जे या आठवड्यात साध्य होण्याची शक्यता आहे. या कन्नड चित्रपटानं रिलीजच्या पाचव्या दिवशीही बंपर कमाई केली आहे.  

'कांतारा चॅप्टर 1'ची पाचव्या दिवसाची कमाई किती?

ऋषभ शेट्टीच्या चित्रपटानं फक्त पाच दिवसांत हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2' आणि अॅनिमेटेड पौराणिक चित्रपट 'महावतार नरसिंह' ला मागे टाकले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित, स्पाय अॅक्शन ड्रामा 'वॉर 2' ने 236.55 कोटी रुपये कमावले, तर 'महावतार नरसिंह' नं त्याच्या आयुष्यात 251.13 कोटी रुपये कमावलेत. 'कांतारा चॅप्टर 1' हा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे. कमाईच्या बाबतीत आता फक्त रजनीकांतचा 'कुली', अहान पांडे-अनित पद्ढा यांचा 'सैयारा' आणि विकी कौशलचा 'छावा' हे चित्रपट या चित्रपटाला मागे टाकतात.

Continues below advertisement

कांताराची आतापर्यंतची कमाई किती? (Kantara Chapter 1 Box Office Collection in 5 Days)

दिवस  कमाई (रुपयांमध्ये)
दिवस पहिला   50 कोटींहून अधिक 
दिवस दुसरा 100 कोटींहून अधिक
दिवस तिसरा 150 कोटींहून अधिक
दिवस चौथा 200 कोटींहून अधिक
दिवस पाचवा 250 कोटींहून अधिक

'कांतारा चॅप्टर 1' लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. 'कांतारा चॅप्टर 1'चं एकूण देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन 247.93 कोटींवर पोहोचलंय. जगभरातील बॉक्स ऑफिसवर, हा चित्रपट आधीच 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करतोय. आता, तो लवकरच भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा बॉक्स ऑफिस हिट होण्याची अपेक्षा आहे.