Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्राचं (Shukra Gochar) संक्रमण कुंभ राशीत 28 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी होणार आहे. शुक्र ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर, 28 डिसेंबर ते 28 जानेवारीपर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे. हा काळ चार राशीच्या (Zodiac Signs) लोकांसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. 


नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोणत्या राशींना नोकरीत प्रमोशनची संधी मिळू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


कुंभ राशीत शुक्राचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभकारक ठरणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, तु्म्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही सुरु करु शकता. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. एकूणच, शुक्राचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


शुक्र ग्रहाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांची प्रगती 28 डिसेंबर ते 28 जानेवारीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या करिअरसाठी फार लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला नोकरीचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या पद प्रतिष्ठेत चांगली वाढ होऊ शकते. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात चांगली सुख शांती नांदेल. तुमच्या जोडीदाराप्रती तुमचं प्रेम वाढेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


शुक्राच्या राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नशिबाची साथ तुमच्या बरोबर असेल. तसेच, तुमच्यासाठी नवीन नोकरीचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल. 


तूळ रास (Libra Horoscope)


शुक्राच्या संक्रमणाने तूळ राशीच्या लोकांना चांगलाच लाभ होणार आहे. 28 डिसेंबर ते 28 जानेवारीपर्यंतचा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतो. या काळात तुम्ही नवीन घर, गाडी, बंगला यांसारख्या प्रॉपर्टीची खरेदी करु शकता. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology Tips : सावधान! तुमच्या 'या' 10 सवयी अत्यंत धोकादायक; वेळीच त्या बदला, अन्यथा...