Mahakal Darshan: अवघ्या काही दिवसात नवीन वर्ष 2025 ला सुरूवात होत आहे, अशात अनेकजण प्रवासाचा बेत आखतात, तर अनेकजण देवाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करतात. दरवर्षी नववर्षानिमित्त महाकाल मंदिरात मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत दर्शनाच्या व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्ही जर नववर्षाला बाबांच्या दर्शनासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...


महाकालते दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करताय?


उज्जैन येथील भगवान शिव महाकालेवर यांच्यावर भक्तांची अतूट श्रद्धा आहे. येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. बाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लोक येतात. महाकालच्या चरणी नवीन वर्षाची सुरुवात व्हावी अशी भक्तांची इच्छा नक्कीच आहे.  बाबा महाकालच्या रोजच्या वेगवेगळ्या आरत्यांमध्येही वेगवेगळे अलंकार त्यांना घातले जातात. यामध्येही भस्म आरती सर्वात प्रसिद्ध आहे. नववर्षात येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. तुम्हीही नवीन वर्षात उज्जैनला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. 26 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत महाकाल मंदिर समिती भक्तांच्या सोयीसाठी वेळोवेळी अनेक बदल करत असते. येत्या काळात येथे होणारी गर्दी पाहता हा बदल करण्यात आला आहे. समितीने दर्शन आणि महाकाल भस्म आरतीच्या वेळेतही बदल केले आहेत.


दर्शन आणि महाकाल भस्म आरतीच्या वेळेत बदल


येत्या काळात येथे होणारी गर्दी पाहता हा बदल करण्यात आला आहे. श्री महाकालेश्वर मंदिराचे प्रशासक गणेश धाकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर समितीने नवीन वर्ष 2025 साठी भस्म आरतीच्या व्यवस्थेत बदल केले आहेत. भाविकांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रशासन असे बदल करत असते.


ऑनलाइन बुकिंग बंद


मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 26 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत भस्म आरतीचे ऑनलाइन बुकिंग करता येणार नाही. अशा परिस्थितीत भाविकांना आरतीसाठी ऑफलाइन परवानगी घ्यावी लागणार आहे. पहाटे 4 वाजता होणारी भस्म आरती पाहण्यासाठी भाविकांना एक दिवस अगोदर ऑफलाइन तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत.


भस्म आरतीचे ऑफलाईन तिकिट कुठे मिळेल?


त्रिवेणी संग्रहालयाजवळील पिनाकी गेटजवळील काउंटरवरून भाविकांना भस्म आरतीची तिकिटे मिळतील. दररोज केवळ 300 भाविकांसाठी ही तिकिटे काढली जाणार आहेत. यासाठी दररोज रात्री 10 वाजल्यापासून भाविकांना ऑफलाइन तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागणार आहे.


हेही वाचा>>>


आई-वडिलांच्या कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते? काय म्हटलंय शास्त्रात? प्रेमानंद महाराजांनी दिलं आश्चर्यकारक उत्तर!


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )